वसई-विरार पालिकेचा मोठा निर्णय

प्रसेनजीत इंगळे

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!

विरार : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या वाढत्या समस्यांवर पालिकेने तोडगा काढत नवीन प्रणालीचा वापर करून बारकोडच्या मदतीने कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. यामुळे कचरा उचलण्यापासून ते कचऱ्याचे वर्गीकरण आणि याचे नियोजन या सर्व गोष्टींत तंत्रज्ञानाच्या मदतीने सुसूत्रता आणून घनकचऱ्याचे प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत. यासाठी पालिकेची आखणी सुरू असून लवकरच ही बारकोड यंत्रणा वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात लागू केली जाणार आहे.

वसई-विरार परिसरात कचरा व्यवस्थापन ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांत पालिका याबाबत कोणतेही यशस्वी प्रयोग राबवू शकली नसल्याने हरित लवादाने पालिकेला मोठा दंड ठोठावला आहे. पालिकेची स्वच्छ भारत योजनेतील आकडेवारीसुद्धा घसरत चालली होती. यात कचरा व्यवस्थापन आणि नियोजन आणि वर्गीकरण याचे कोणतेही निकष पालिका पालन केले जात नसल्याचे निदर्शनात आले होते. तसेच अनेक ठिकाणी कचरा न उचलणे, त्याचे वर्गीकरण न करणे, कचराभूमी इतरेतर कचरा टाकणे अशा अनेक तक्रारी स्थानिकांकडून वाढल्या होत्या. यामुळे पालिकेने यावर आता तोडगा काढत नवीन तंत्रज्ञान वापरून नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात माहिती देताना पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, याबाबत शासनाच्या काही सूचना आहेत. त्यानुसार पालिका काम करत आहे. तसेच सदर प्रणालीमुळे कचरा व्यवस्थापनाच्या समस्या बहुतांशी मार्गी लागणार आहेत.   

बारकोड पद्धतीचा वापर  

वसई-विरार महानगरपालिकेने नवी पद्धत आणली आहे. यात सर्व गृहसंकुलाच्या बाहेर कचराकुंडीच्या ठिकाणी बारकोड लावले जाणार आहेत. यात बैठय़ा चाळी, स्वतंत्र घरांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. सकाळी कचरा उचलण्यासाठी आलेल्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलून हा बारकोड स्कॅन करायचा आहे. याची माहिती गृहसंकुलांनासुद्धा असणार आहे. यामुळे या इमारतीतील कचरा नियमित उचलला जात आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर त्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे की नाही याची माहितीसुद्धा मिळणार आहे. असेच कचरा उचलणाऱ्या घंटागाडय़ांचे मार्ग आणि ते कुठे कचरा टाकतात याची माहितीसुद्धा मिळणार आहे. तसेच किती कर्मचारी कामावर आहेत याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. सध्या प्राथमिक तत्त्वावर याचे काम सुरू केले जाणार आहे.

  सध्या प्राथमिक पातळीवर या प्रणालीची चर्चा सुरू आहे, याचे प्रात्यक्षिक पालिका घेत आहे. याचे फायदे-नुकसान याचा अभ्यास केला जात आहे. काही ठिकाणी प्राथमिक तत्त्वावर ही प्रणाली सुरू करून पाहणी केली जाणार आहे.

– अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका