आज आहे पांडव पंचमी. पांडवांनी याच दिवशी १२ वर्षांचा वनवास आणि एक वर्षांचा अज्ञातवास पुरा केला आणि लगेचच विराट साम्राज्याच्या रक्षणासाठी अर्जुन कौरवसेनेसमोर प्रकट झाला. हाच दिवस जैन संस्कृतीत ज्ञानपंचमी म्हणून साजरा होतो. हा आहे ज्ञानपूजेचा दिवस. या दिवशी ध्यान व प्रार्थना केल्यास ‘दुसरा सूर्य’ म्हणजेच ‘ज्ञान’ प्राप्त होतं अशी कल्पना आहे. दिवाळीचा समारोप करणारा हा जैनांचा सण वास्तुपुरुष जैन संप्रदायासोबत भल्या पहाटे अनुभवत होता, बेंगळुरूजवळील श्रवणबेळगोळा येथील टेकडीवर. गोमतेश्वर बाहुबलीचं भव्य शिल्प विंध्यगिरी टेकडीवर अभिमानाने उभं होतं. काíतकाच्या शुक्ल पक्षाच्या सुरुवातीला तारकासमूह नभांगणात चमचमत होते. कृत्तिका नक्षत्र पश्चिम क्षितिजावर कललं होतं, तर रोहिणी आणि मृग त्याच्या मागोमाग होते. वरून व्याध गोमतेश्वराच्या शीर्षांवर चांदणं शिंपत होता. श्वेतांबर जैन मुनी आणि भिक्षुणींच्या प्रार्थनांची आर्त सुरावट आसमंतात भिरभिरली. वास्तुपुरुषही त्या ज्ञानपूजेत स्वत:ला हरवून बसला. ‘दुसरा सूर्य’ सर्वाच्या अंत:करणात प्रकटायच्या आधीच सूर्यदेवाने पूर्व क्षितिजावर रंगांची उधळण केली आणि  वास्तुपुरुषाच्या अंत:करणात ज्ञानेश्वरी उमलली-

‘‘सूय्रे अधिष्ठिली प्राची। जगा जाणीव दे प्रकाशाची

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

तसी श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।।’’

उगवत्या भास्कराने बाहुबलीच्या भव्य बाहूंना सोनेरी किरणांनी अलगद स्पर्श केला. त्या मंत्रमुग्ध वातावरणात वास्तुपुरुषाची नजर गोमतेश्वरावरून फिरायला लागली आणि त्याच्या पायांवर स्थिरावली. पायांवर कोरलेल्या वेलबुट्टीतून पावलांवर उजळणारा ‘श्री चामुंडराजे करवियले —’ हा १०व्या शतकातील प्राकृत शिलालेख त्याला पुरातन काळात घेऊन गेला. सामान्य युगाच्या तीन शतकं आधी याच ठिकाणी चंद्रगुप्त जैन साधू झाला या इतिहासापासून ते पुढील गंगा, राष्ट्रकूट, होयसाला, विजयनगर या साम्राज्यांनी या परिसरात विकसित केलेल्या उत्कृष्ट कला आणि वास्तुशिल्प वैभवाचा आलेख त्याच्या नजरेसमोर आला. त्या गतवैभवाच्या आठवणी उजळत वास्तुपुरुषाने बेंगळुरूच्या केंपेगौडा मनोऱ्याच्या दिशेने प्रयाण केलं. उपराळकर देवचारासमोर या शतकातल्या ‘अंधेर नगरी’चं चित्र मांडायचं होतं आणि त्या चित्राला संतुलित विकासाचा साज चढवायचं क्लिष्ट कामही करायचं होतं.

‘‘सुस्वागतम् वास्तुपुरुषा! हर्दकि शुभेच्छा ज्ञान-दिवाळीच्या! कसा काय गेला हा दिवाळीचा पंधरवडा बेंगळुरू नगरीत?’’ उपराळकर देवचाराने लालबागच्या हिरवाईतून वास्तुपुरुषाचं लक्ष वेधून घेतलं. ग्रॅनाइट शिलाथरावर विचारात पहुडलेला वास्तुपुरुष भानावर आला, ‘‘अनेक दंडवत, देवा महाराजा! डोळे उघडले माझे इथल्या अनुभवांनी आणि निरीक्षणांनी. मुख्य म्हणजे हे शहर सर्वच भारतीय शहरांचं प्रतिनिधित्व करतंय हेही लक्षात आलं. त्यामुळे मी आता जे काही चित्र तुझ्यासमोर मांडणार आहे ते सर्वच भारतीय शहरांचं आहे असं समजून चाल.’’

‘‘चल वास्तुपुरुषा, सुरू कर तुझं विवेचन या ज्ञानपंचमीच्या मुहूर्तावर. पण मला तर तू फारच कातावलेला दिसतो आहेस. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हा दीपावलीचा संदेश ध्यानात ठेव आणि  पुढे चल, हतबल न होता.’’ उपराळकर देवचार आतुर होता वास्तुपुरुषाचे सकारात्मक विचार ऐकायला.

वास्तुपुरुषाने मनोऱ्याकडे नजर रोखत मनातल्या मनात केंपेगौडांकडे क्षमायाचना केली, ‘‘देवचारा, मी आताच बाहुबलीच्या परिसरातून ज्ञानपूजा करून आलो. केंपेगौडांच्याही आधी अनेक द्रष्टय़ा सम्राटांनी पुरातन कालापासून या परिसरात केलेली सांस्कृतिक तपस्या आणि कला, वास्तुशिल्पांच्या निर्मितीच्या इतिहासात रमून आलो. या गतवैभवाचे वारसदार काय करताहेत? लोकशाही निर्मित सरकार, राजकीय पक्ष, सरकारी नोकरशाही आणि सर्वसामान्य जनतासुद्धा एका षड्यंत्राचा भाग झाली आहे, ‘उद्यान नगरी’ला ‘अंधेर नगरी’कडे नेण्याच्या! काही तुरळक अपवाद आहेत, आशेचा कवडसा दाखवणारे. मीही सामील झालो होतो त्या ‘अपवादां’च्या मूक आंदोलनात नुकताच आणि सरकारचा नाकत्रेपणा आणि उद्दामपणा अगदी जवळून पाहिला. सरकारने आणि सरकारी नोकरशहांनी अचानक लादलेल्या सुमारे १८०० कोटींच्या आणि सुमारे ९०० वृक्ष नष्ट करणाऱ्या प्रचंड लोखंडी उड्डाणपुलाविरोधी आहे हे आंदोलन. अनेक स्वयंसेवी संस्था, नगरनियोजनकार, वास्तुकलाकार, कलाकार, विचारवंत, जागरूक नागरिक या आंदोलनात सामील झाले आहेत. पण बहुतांश जनता मात्र निष्क्रिय आहे. त्याचाच फायदा घेऊन, लोकसहभागाशिवाय आणि पर्यावरण क्षमतेच्या अभ्यासाशिवाय प्रकल्प पुढे दामटणाऱ्या सरकारला तात्पुरता का होईना हिसका दिला आहे राष्ट्रीय हरित लवादाने. हे उदाहरण प्रातिनिधिक आहे. असेच प्रचंड प्रकल्प सर्वागीण नियोजनाशिवाय अनेक शहरांवर लादले जात आहेत. मुद्दा उड्डाणपुलाचा नसून सर्वागीण विचार आणि पर्यावरण संवेदनक्षमतेच्या अभावाचा आहे. शहराचं सुयोग्य वाहतूक नियोजन करण्याऐवजी लहरीनुसार ‘मॅजिक बॉक्स’, उड्डाणपूल, रुंदीकरण यांसारखे मोठमोठे, कोटय़वधींचे प्रकल्प पुरातन वृक्षांची कत्तल करून, पर्यावरणाचा ऱ्हास करत लादले जात आहेत. सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांचा, पादचाऱ्यांसाठीच्या आणि विकलांग जनतेच्या सोयींचा, समाजहिताचा थोडाही विचार केला जात नाही. खाजगी गाडय़ा वापरून विमानतळाकडे वेगाने जाऊ इच्छिणाऱ्या ५% जनतेसाठी ९५% जनतेला आणि शहराच्या पर्यावरण आरोग्याला वेठीला धरलं जात आहे. तेही कोणाच्या तरी लहरीतून आणि आर्थिक लाभावर डोळा ठेवून दिलेल्या पर्यायातून! त्याही पुढे जाऊन तेच सरकार आणि राजकीय पक्ष आपापल्या राजकीय उद्देशांसाठी याच मार्गावरील ‘पॅलेस ग्राउंड’वर मोठमोठय़ा सभा, मोच्रे घेऊन रस्त्यावरील वाहतुकीचा तासन् तास खोळंबा करायला मागे-पुढे पाहात नाहीत. गेल्याच आठवडय़ात अशाच एका सरकारी सभेमुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक सुमारे पाच तास खोळंबली. रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की गाडय़ा कशाबशा बलगाडीच्या गतीने प्रवास करू शकतात. वाहतूकसंबंधित सुरू केलेले प्रकल्प वर्षांनुर्वष रखडताहेत, वाहतुकीला अधिक मंदावताहेत, अपघातांना आमंत्रण देताहेत. पादचाऱ्यांसाठीच्या सोयींचा तर अजिबात विचार नाही. सामान्य जनताही या अनागोंदी वाहतूक अव्यवस्थेत भर टाकत असते- सर्व नियमांना, कायद्यांना गुंडाळून! नुकताच सर्व शहरवासीयांनी दसरा-दिवाळी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला. दुसऱ्याच दिवशी शहरातील रस्ते, परिसर कचऱ्याचं साम्राज्य झालं. गणेशोत्सव आणि नवरात्रानंतर तर सर्वच तलावांवर आणि पाणवठय़ांवर अत्याचार. लोकांना पर्वा नाही, सरकारी नोकरशाहीला कर्तव्याची जाण नाही! गेल्या महिन्यात कावेरी पाणीवाटपावरून मोठी आंदोलनं झाली, काही सरकारच्या पिठब्याने! कोटय़वधींची वित्तहानी झाली, विशेषत: सरकारी म्हणजेच जनसामान्यांच्या मालमत्तेची. एका बाजूला पाणीटंचाईचे अश्रू ढाळले जात असतानाच, दुसरीकडे पाण्याचा अपव्यय, गळक्या-फुटलेल्या जलवाहिन्यांतून होणारा पाण्याचा नाश, नद्या-ओढे-तलावांतील पाण्यातील प्रदूषण आणि हा विरोधाभास डोळ्यांसमोर अंधारी आणतो आहे. या शहरांतील सर्वसामान्य जनताही षड्यंत्राचा भाग कसा झाली आहे याचं सतत नजरेसमोर दिसणारं आणि हतबल करणारं उदाहरण म्हणजे बेकायदा बांधकाम. बेंगळुरू आणि अशा सर्वच शहरांतून दिसणारं हे विषण्ण चित्र आहे. शहर नियोजनाचे, विकासाचे सर्व नियम शब्दश: ‘धाब्या’वर बसवून इमारती व इमले उठवले जात आहेत. इमारतीसभोवतालची अत्यावश्यक मोकळी जागा तर ठेवली जात नाहीच, पण बेकायदेशीर अधिक मजले उठवले जात आहेत. रहिवासी विभागात व्यापारी इमारती बेकायदा उभ्या रहात आहेत. सरकारी नोकरशहा या बेकायदेशीर कामांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी हातभारच लावत असल्याने सर्व प्रशासन यंत्रणा कोसळली आहे. आवश्यक वाहनतळांची सोय न केल्याने अरुंद रस्तेसुद्धा वाहनतळ होऊन वाहतुकीला अडथळा करत आहेत. एखाद्या दुर्घटनेच्या वेळी रुग्णवहिका किंवा अग्निशामक वाहनसुद्धा पोचू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने नियंत्रणाचा देखावा केला, कालवे आणि तलावांवरील बेकायदा अतिक्रमण हटवण्याचा. गोरगरिबांची घरं पाडली गेली, त्यांना रस्त्यावर फेकण्यात आलं. श्रीमंतांचे बेकायदा इमले आणि अतिक्रमित व्यापारी संकुलं मात्र दिमाखात उभी आहेत, शहराला वाकुल्या दाखवत. आणि नियंत्रण प्रकल्प बासनात गुडाळला गेला! देवा महाराजा, ही शहरं विनाशाकडे चालली आहेत- महानगरांकडून मृत्युनगरीकडे!’’

उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाचा हताश ओघ रोखला, ‘‘वास्तुपुरुषा, या शहरांची सद्य:स्थिती विदारक आहे हे खरंच. पण जर वास्तुपुरुषच हतबल झाला तर मग त्या ज्ञानपूजेचा काय उपयोग? मला वाटतं नुकताच पाडव्याला तू निर्धार केला होतास सर्वसहभागी आणि संतुलित विकासाचा मार्ग दाखवण्याचा. चल, या दीपावलीचा समारोप सर्वाच्या मनातील, विचारातील अंधकार दूर करून करू या.’’

वास्तुपुरुषाने केंपेगौडांच्या मनोऱ्याकडे गंभीर नजर टाकली आणि तीच नजर लालबागच्या हिरवाईच्या दिशेने वळवली, ‘‘होय देवा महाराजा, हा मावळता दिनकर तोच संदेश देत आहे, उद्याच्या उष:कालाचा. आशा आहे त्या अपवादात्मक, तुरळक, पण विचारी आणि न्याय्य हक्कांसाठी झगडणाऱ्या क्रियाशील नागरिकांवर. करतो प्रयत्न या हतबलतेतून बाहेर पडण्याचा. या शहराच्या प्रातिनिधिक अधोगतीची कहाणी आपण ऐकली. आता पुढे येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेच्या दीपोत्सवापाठोपाठ दाखवतो दिशा जनजागृतीची, पर्यावरणस्नेही विकासाची.’’ अस्ताला गेलेल्या सूर्याने नभांगणात आशेच्या रंगांची उधळण केली तर आणि पाठोपाठ शुक्राने कातरवेळेच्या संधीप्रकाशातून नव्या दिशेचा किरण उजळला.

ulhasrane@gmail.com