वेदवती चिपळूणकर परांजपे

थेट फॅशन बाजारावर आणि फॅशनप्रेमींच्या मनावर प्रभाव पाडणारा लॅक्मे फॅशन वीक नुकताच पार पडला. नेहमीच्या प्रथेप्रमाणे अनेक डिझायनर्सनी आपली कलेक्शन्स फॅशन वीकमध्ये सादर केली, तर अनेक सेलेब्रिटींनी हे डिझायनर कपडे परिधान करत या शोला ग्लॅमर मिळवून दिले. लॅक्मेचा हा सीझन समर सीझन म्हणून सादर होतो, ज्यात प्रामुख्याने समर कलेक्शन असतात. उन्हाळय़ातली लग्नसोहळय़ांची  गर्दी लक्षात घेत त्या अनुषंगाने फेस्टिव्ह कलेक्शन्ससुद्धा वर्षांतल्या या पहिल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये प्रेझेंट होतात. सामान्यत: उन्हाळा लक्षात घेऊन या सीझनमधली डिझाइन्स असणं अपेक्षित असतं, मात्र यावेळी लॅक्मे फॅशन वीकच्या सीझनमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

Why do flamingos change their way 39 flamingos have died in plane crashes till now
फ्लेमिंगो पक्ष्यांचा मार्गबदल का?
Sangli, World Nurses Day, World Nurses Day celebration, Honoring Nursing Staff, Dedication of Nursing Staff,
सांगली : परिचारिका दिनानिमित्त सांगलीत परिचारिकांचा सन्मान
lokmanas
लोकमानस: काळय़ा पैशाचे सुखेनैव टेम्पोभ्रमण
mira bhaindar fake baba, vinod pandit fake baba marathi news
जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, मिरा रोडचा ढोंगी बाबा विनोद पंडितला अटक
This is why experts warn against storing your toothbrush in the bathroom
तुम्ही तुमचा टूथब्रश कुठे ठेवता? बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा
shivar lokarang article, shivar loksatta
शिवाराच्या दयनीय अवस्थेचे चित्र…
nagpur, acid attack, acid attack in Nagpur, Girlfriend Throws Acid on Boyfriend's Face, Girlfriend Boyfriend Argument, Severe Injuries Reported, Nagpur crime news, crime in Nagpur, Nagpur accid attack case,
नागपुरात ॲसिड हल्ला; प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले
book review the beast you are stories by paul tremblay
बुकमार्क : आजच्या काळातील भयकथा

उन्हाळय़ासाठी वापरल्या जाणाऱ्या टिपिकल पेस्टल कलर्सना बाजूला टाकून यंदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये बहुतेक डिझायनर्सनी डार्क शेड्स वापरल्या होत्या. एमरल्ड ग्रीन, डीप ब्लू, मेटॅलिक ब्लू, मेटॅलिक रेड अशा कलर्समध्ये वेिडग गाऊन्स डिझाइन करण्यात आले होते. मध्यंतरी आलेला पेस्टल शेड्सचा ट्रेण्ड अचानक मागे टाकून डार्क शेड्सकडे सगळे डिझायनर्स वळलेले दिसले. मात्र हेच जुन्या ब्राईट रेड, येलो, ऑरेंज या पारंपरिक रंगांतील वेिडग लेहंगा किंवा गाऊन्सच्या बाबतीत म्हणता येत नाही. सहसा या पारंपरिक रंगांचे डिझाइन्स नव्याने सहज पाहायला मिळत नाहीत. त्यातल्या त्यात फॅशन डिझायनर गौरांग शाहच्या कलेक्शनमधील गुलाबी रंगाच्या शेड्स सोडल्या तर इतर डिझायनर्सनी त्या ब्राईट कलर्सना पूर्णपणे वगळून, पेस्टलवरही अडकून न पडता, मेटॅलिक डार्क शेड्सचा वेगळाच ट्रेण्ड आणायचा प्रयत्न यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकच्या सीझनमध्ये केला आहे. या मेटॅलिक डार्क शेड्सच्या डिझाइन्सचेही दोन प्रकार या सीझनमध्ये पाहायला मिळाले.

एक अपेक्षित प्रकार म्हणजे प्लेन मेटॅलिक शेड्स. गाऊन्सना थोडासा फ्लेअर देऊन, स्लीव्हजना एक्स्ट्रा फ्लेअर देऊन पूर्ण गाऊन प्लेन ठेवण्यावर भर दिला गेला. अशी डिझाइन्स मेटॅलिक फील असणाऱ्या लाल, हिरवा, निळा, गुलाबी, काही वेळा पिवळा किंवा मजेंटा अशा कलर्समध्येही पाहायला मिळाली. या रंगांना उठाव येण्यासाठी फॅब्रिक बहुतेक करून सॅटिन किंवा सिल्क वापरण्यात आलं. या फॅब्रिक्समुळे आपोआपच त्या रंगाला ग्लेझ येते. त्याचे फ्लेअर्स, स्लीव्हज ड्रॉप होऊ नयेत म्हणून नेट मेश हे आतल्या बाजूने फॅब्रिकला लावलं जातं. याच फॅब्रिकचे केवळ गाऊन्स नव्हे तर गाला गाऊन्स आणि सूट्ससुद्धा वुमेन कलेक्शनमध्ये सादर झाले. सूट्सना कॉम्बिनेशन म्हणून डार्क कलर्ससोबत व्हाईट किंवा सिल्व्हरची जोड दिली गेली. सूट आणि बॉटम डार्क कलरने तर उरलेले पीस जसे शर्ट, टाय, स्टॉकिंग्ज अशा गोष्टी मेटॅलिक व्हाईट, सिल्व्हर अशा रंगात वापरले गेले.

दुसरा प्रकार मेटॅलिक डिझाइन्समधला अधिक इंटरेस्टिंग होता. मेटॅलिक कलसर्वंर फ्लोरल डिझाइन्स आणि त्यातून वेिडग गाऊन्स आणि सूट्स डिझाइन केले गेले. मेटॅलिक ब्लू वर रंगीबेरंगी फुलांची एम्ब्रॉयडरी करून त्या फुलांना अधिक उठाव आणला गेला. मोठमोठय़ा फुलांची एम्ब्रॉयडरी वापरून त्या मेटॅलिक कलर्सकडे अधिक लक्ष वेधले गेले. फुलांचे रंग गुलाबी, पिवळा, केशरी, आकाशी, जांभळा असे ठेवून आणि थोडेसे भपकेदार म्हणजेच ब्राईट ठेवून फुलांची डिझाईन्सही उठावदार केली गेली. याविरुद्ध मेटॅलिक कलर्समध्ये सेल्फ फ्लोरल एम्ब्रॉयडरी हा एक वेगळाच ट्रेण्ड या सीझनमध्ये पाहायला मिळाला. त्यात एम्ब्रॉयडरी होती, कटवर्क होतं आणि अगदी पॅचवर्कसुद्धा होतं. सेल्फमधली एम्ब्रॉयडरी उठून दिसावी म्हणून त्याला काही डिझाईन्समध्ये सिक्वेन्स तर काही डिझाईन्समध्ये बादला वर्कने चमकवण्यात आलं होतं. सेल्फ एम्ब्रॉयडरीचे पॅटर्न्‍स फुलकारी किंवा लखनवी टेक्निकचे होते. याच संपूर्ण पॅटर्नमध्ये वेिडग लेहंगा, गाऊन, गाला गाऊन, सूट असे सगळे डिझाइन्स प्रेझेंट केले गेले. याच बरोबर सगळय़ात वेगळी गोष्ट म्हणजे समर कलेक्शन असूनसुद्धा डिझाईन्समध्ये काळय़ा रंगाचा मनसोक्त वापर केला गेलेला या सीझनमध्ये पाहायला मिळाला. डार्क शेड्सला साजेशी अशी जी जी इनोव्हेटिव्ह डिझाइन्स केली गेली तीच ब्लॅकमध्ये सुद्धा करण्यात आली. ब्लॅक कलरवर फ्लोरल पिंट्र असलेला सूट अभिनेत्री माधुरी दीक्षितने प्रेझेंट केला. तर अशाच प्रकारच्या ब्लॅक डिझाइन्समध्ये मेन्स आणि वुमेन दोन्ही कलेक्शन्स सादर करण्यात आली. ब्लॅकसोबत कॉम्बिनेशन म्हणून पांढरा, ग्रे, सिल्व्हर असे रंग खासकरून वापरले गेले.

या सगळय़ा डिझाइन्समध्ये काही डिझाइन्स जुन्याच पद्धतीने फ्रेश करणारी फ्रेश कलर्समध्ये बनवली गेलेली होती. पिवळा, पेस्टल ग्रीन, पेस्टल ग्रे अशा शेड्सवर फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि टिपिकल फ्लेअर असलेले गाऊन्स, लेहंगा अशी डिझाइन्स यावेळी सादर झाली. कॉम्बिनेशनमध्ये एखाद दुसरा डार्क कलर वापरला गेला, मात्र मुख्य फोकस लाइट शेडवर किंवा व्हाईट शेडवर केला गेला. उदा. सूटच्या डिझाइनमध्ये व्हाईट सूट आणि डार्क शर्ट वापरुन सूटच्या पॅन्टवर फ्लोरल पिंट्र वापरलं गेलं, जे त्या व्हाइट बॅकग्राऊंडवर उठून दिसलं. पेस्टल शेड्समध्येसुद्धा नेहमीच्या टिपिकल पेस्टल पिंक, अबोली अशा रंगांपेक्षा पेस्टल ग्रीन आणि ग्रे यांच्यावर जास्त भर देण्यात आला. ग्रे कलरवर मोठय़ा फुलांची पिंट्र किंवा एम्ब्रॉयडरी हा ट्रेण्ड पेस्टल डिझाईन्समध्ये जास्त पाहायला मिळाला. पेस्टल शेड्ससाठी रॉ सिल्क, सिल्क, सॅटिन, नेट, जॉर्जेट अशी अनेक फॅब्रिक्स वापरण्यात आली.

नेहमीच्या डिझाइन्सपेक्षा वेगळा फॅक्टर म्हणजे वेअरेबल स्ट्रीटवेअर. समर कलेक्शनमध्ये सामान्यत: न दिसणारे हे डिझाईन्स स्केचर्सने प्रेझेंट केले. नेहमीचे स्ट्रीट वेअर, जे प्रत्यक्ष वापरण्यायोग्य नसते असा समज असतो, त्यापेक्षा हे स्ट्रीटवेअर खरोखर वेअरेबल कॅटेगरीमध्ये बसेल असे डिझाईन केले गेले. यावर्षीचा समर सीझन सर्वच डिझायनर्सच्या वेअरेबल डिझाईन्सनी गाजवला, असं म्हणायला हरकत नाही.