केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीच्या माध्यमातून नगर शहरातील प्रत्येक प्रभागात ‘प्रभाग विकास समिती’ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायक देशमुख यांनी दिली. देशमुख यांनी समितीची शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करतानाच शहरात समितीसाठी पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे सल्लागार मंडळ स्थापन केले आहे.
समितीच्या शहर जिल्हा कार्यकारिणीत १९ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशांत गर्जे (शहर जिल्हाध्यक्ष), अशोक काळे, डॉ. केदार काळे, विवेक नवले, नलिनी गायकवाड, संजय भिंगारदे, नवनाथ काकडे (सर्व उपाध्यक्ष), मंगल भुजबळ, प्रविण सांगळे, मुकुल देशमुख, प्रकाश गाडे व अंबादास बुरा (सर्व सरचिटणीस), ॠषिकेश टोकेकर, संतोष खोकराळे, योगेश देशमुख, नंदकिशोर मोरे, संदीप जाधव व महेश तांबे (चिटणीस) असे पदाधिकारी आहेत.
या समितीसाठी सुवालाल गुंदेचा, भास्करराव डिक्कर, डी. एम. कांबळे, सुभाष गुंदेचा, ब्रिजलाल सारडा, गोपाळराव झोडगे, दीप चव्हाण व उबेद शेख यांचे सल्लागार मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. समितीमार्फत शहरातील प्रत्येक प्रभागात वार्ड विकास समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रभाग समिती २५ जणांची असेल. त्यात ज्येष्ठ नागरीक, वकिल, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, निवृत्त शिक्षक, डॉक्टर, तरुण मंडळांचे पदाधिकारी यांची त्यावर नियुक्ती केली जाणार आहे, तसेच प्रत्येक प्रभागात जनसेवकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.