काँग्रेस पक्षाच्या भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या (एनएसयूआय) प्रदेशस्तरीय निवडणुकीत सोमवारी मतदानाच्या दिवशी विरोधी पॅनेलच्या उमेदवाराचे अपहरण करून विरोधात मतदान करू नये म्हणून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक गट मुख्यमंत्र्याच्या कराडचा तर दुसरा गट केंद्रीय गृहमंत्र्याच्या सोलापूरचा आहे. सुमीत गणपत भोसले (वय २५, रा. राघवेंद्रनगर, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवराज मोरे आणि त्याचा भाऊ ॠतुराज मोरे (रा. दोघेही कराड) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएसयूआयच्या निवडणुकीत भोसले हे सरचिटणीस व मोरे हे अध्यक्ष पदाचे परस्परविरोधी पॅनेलचे उमेदवार आहेत. या निवडणुकीत मदतानाच्या वेळी आरोपी मोरे बंधू यांनी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बालेवाडी येथून शस्त्राचा धाक दाखवून मोटारीतून अपहरण केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 26, 2012 3:14 am