देशभरात स्त्रीभ्रूणहत्या, स्त्रियांवरील अत्याचार आदी प्रकरणांची चर्चा जोरात सुरू असताना मंगळवारी संध्याकाळी मुंबईत मात्र स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा पार पडला. निमित्त होते ‘सह्य़ाद्री हिरकणी पुरस्कारां’चे! गेल्या नऊ वर्षांपासून विविध क्षेत्रांतील महिलांच्या कतृत्त्वाला सलाम करण्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी विविध क्षेत्रांतील दिग्गज प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात उपस्थित होते. नानाविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, मान्यवरांची हजेरी आणि यंदाच्या नऊ हिरकणींची उपस्थिती यामुळे या सोहळ्याची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. यंदा सह्य़ाद्री वाहिनीने दोन महिलांना त्यांच्या कतृत्त्वासाठी विशेष पुरस्कार प्रदान केले.
शिक्षण, कॉस्मॅटॉलॉजी, समाजसेवा, विधी, सीए, अंटाक्र्टिका मोहिमेतील प्रतिनिधी अशा विविध क्षेत्रांती ‘हिरकणीं’चा सन्मान करण्यासाठी किरण शांताराम, अमोल पालेकर, जॉनी लिव्हर, अमीन सायानी, गोविंद निहलानी, डॉ. स्नेहलता देशमुख, रोहिणी हट्टंगडी, डॉ. राजन वेळुकर, अजित वाडेकर आदी मान्यवर तसेच प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल कोल्हे व समीरा गुजर या दोघांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात झाली ती रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बँडच्या कार्यक्रमाने! यंदा महाराष्ट्रातील पहिल्या निवडणूक आयुक्त व लेखिका नीला सत्यनारायण, खडतर परिस्थितीत सीएसारख्या कठीण परीक्षेत देशातून पहिली येण्याची मान मिळवलेली प्रेमा जयकुमार, मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित जळगाव जिल्ह्य़ात बचत गटाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नीलिमा मिश्रा, महिला चळवळीत सक्रीय काम करणाऱ्या शारदा साठे, अंटाक्र्टिका मोहिमेत सहभागी होऊन ‘पोलार वुमन’ बनण्याचा मान मिळवलेल्या डॉ. देवयानी बोरोले, सौंदर्य स्पर्धासाठी मुलींचा चेहरा तयार करणाऱ्या कॉस्मॅटॉलॉजिस्ट डॉ. जमुना पै, भारताच्या पहिल्या महिला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग, ज्येष्ठ समाजसेविका प्रीती पाटकर आणि शिक्षणतज्ज्ञ ग्रेस पिंटो यांचा हिरकणी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
त्याशिवाय टेनिसमधील आशिया खंडातील पहिली आंतरराष्ट्रीय महिला रेफ्री बनण्याचा मान मिळवलेल्या शीतल कन्नमवार अय्यर आणि मृतदेह स्वच्छ करून सरणावर चढवण्याचे कार्य करणाऱ्या सुनीता पाटील यांना विशेष हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इतर लोक स्त्रीला काय समजतात, यापेक्षा ती स्वत:ला काय समजते, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. स्त्री म्हणजे कळी आहे. ती उमलणारच! पण तिला पूर्णपणे खुलून देण्यासाठी पुरुषांनी मदत करायला हवी, असे सांगत दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी या हिरकणी पुस्कारांमागील भूमिका विशद केली. निर्मला सावंत-प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, ज्योती म्हापसेकर आणि मुकेश शर्मा यांच्या समितीने या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांतील महिलांची निवड केली.

Nagpur rape, Nagpur two womans raped every day
धक्कादायक! गृहमंत्र्यांचे गृहशहर नागपुरात दर दिवशी दोन महिलांवर अत्याचार, तीन वर्षांत २६० हत्याकांड
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
baramati couple found dead marathi news
बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित