मुळा धरणाचे आवर्तन उशिरा सुटल्यामुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीस सत्ताधारी आमदार शंकरराव गडाख व प्रशासनच जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे नेवासे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.
मुरकुटे यांनी म्हटले आहे, की या वेळेचा दुष्काळ हा गडाखांच्या राजकारणामुळे आहे. काँग्रेसने ऑक्टोबर २०१३मध्ये जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले होते. नोव्हेंबरमध्ये रास्ता रोको करून डिसेंबर, फेब्रुवारी, एप्रिल या महिन्यांत आवर्तने सोडण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु कालवा समितीच्या डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत ५ जानेवारीला रब्बी व एप्रिलमध्ये खरीप असे दोनच पाण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे रब्बीचे आवर्तन एक महिना उशिरा झाले आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, ऊस ही हातची पिके गेली आहेत.
सत्ताधा-यांना वेळेवर पाणी सोडण्याचे अधिकार नसतील तर त्यांनी श्रेयाचे राजकारण करू नये अशी टीका करत फाटके यांनी सत्ताधारी पावसाचेसुद्धा श्रेय घेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत अशी टीका केली आहे.