प्रत्येक स्त्रीसाठी आई होणे ही सर्वात आनंदाची गोष्ट असते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट असते. आपल्या बाळापासून आईल क्षणभरही दूर राहावे असे वाटत नाही पण आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रीयांना नाईलाजाने बाळापासून दूर राहावे लागते. करिअर आणि मुल यापैकी एकाची निवड करणे स्त्रीयांसाठी अत्यंत कठीण असते. अनेकदा स्त्री बाळासाठी आपले नोकरी सोडून देतात पण काही स्त्री नोकरी करत आपल्या बाळाची काळजी घेतात. पण अशा वेळी आईच्या मनात नेहमी अपराधीपणाची भावना येत राहते. बाळाबरोबर वेळ घालवता येत नाही म्हणून, त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी उपस्थित नसेल तर अशावेळी आईला फार वाईट वाटते. आपले काही चुकते आहे का अशी भावना महिलांना जाणवते आणि स्वत:ला दोष देत राहातात. ही अवस्था सध्या Mamaearth सह-संस्थापक गझल अलघ यांची झाली आहे. नोकरी करणाऱ्या आईचा संघर्ष काय असतो याची जाणीव त्यांना चांगली आहे.

गझल अलघ यांनी LinkedIn वर नोकरी करणाऱ्या पालकांच्या संघर्षावर प्रकाश टाकणारी मनापासून लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “मी एक वाईट आई आहे का?” हा प्रश्न माझ्या मनात सारखा येत होतात कारण मी माझ्या मुलाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी त्याच्याबरोबर जाऊ शकत नव्हते. मी खूप रडले, मला अपराधी असल्यासारखे वाटले पण आजीबरोबर शाळेत निघालेल्या मुलाला मी धाडसीपणे निरोप दिला. नोकरी करणाऱ्या पालकांना हे सर्व करावे लागते. तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्हाला सुट्टी घेता येत नाही.”

गझल यांच्या मनात भावनांचा वादळ उठले असूनही तिने नोकरी करताना तिने मुलाच्या बाबातीत गमावलेल्या मौल्यवान क्षणांची कबुली दिली. पोस्टमध्ये ती पुढे म्हणाली की,” मला माझे काम करण्याशिवाय पर्याय नाही पण मी काय गमावत आहे…
-त्याचा उत्साह
-त्याचे हास्य आणि कित्येकदा त्याचे अश्रू
-शाळेत प्रवेश करताची त्याची प्रतिक्रिया
-नवीन शिक्षक आणि मुलांना भेटल्यावर त्याला जाणावणारी अस्वस्थता”

गझलने तिच्या सासूबाईंना स्वतःसाठी तयार केलेली “सपोर्ट सिस्टीम” म्हणून श्रेय दिले. एका छताखाली चार पिढ्यांसह एकत्रित कुटुंबात राहण्याच्या तिच्या निर्णयावर प्रकाश टाकत गझलने जवळचे नातेवाईक आणि समजूतदार मित्रांचा समावेश असलेली सपोर्ट सिस्टीम” असण्याचे फायदे अधोरेखित केले.

हेही वाचा – एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?

“प्रत्येक दृष्टिकोनाचे स्वतःचे फायदे आणि तोटे असले तरी, मला वाटते संयुक्त कुटुंब मुलांसाठी एक अद्भुत वातावरण तयार करतात,” असे गझल तिच्या पोस्टमध्ये सांगते.

अशा जगात जिथे नोकरी करणाऱ्या महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह करिअरच्या आकांक्षांचा समतोल साधण्यासाठी अनेकदा आव्हानांचा सामना करावा लागतो, गझलने सांघिक कार्याचा एक प्रकार म्हणून संयुक्त कुटुंबांना सामान्य बनवण्याचा सल्ला दिला. आईच्या करिअर आणि वैयक्तिक ध्येयांशी तडजोड न करता मुलांना प्रेम आणि संरक्षण मिळेल असे वातावरण निर्माण करण्याच्या महत्त्वावर तिने भर दिला.

“प्रत्येक दृष्टिकोनाचे स्वतःचे फायदे आणि तोटे असले तरी, मला वाटते एकत्र कुटुंब मुलांसाठी एक अद्भुत वातावरण तयार करतात,”असे तिने तिच्या पोस्टमध्ये जोडले.

“अशा जगात जिथे नोकरी करणाऱ्या महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह करिअरच्या आकांक्षांचा समतोल साधण्यासाठी अनेकदा आव्हानांचा सामना करावा लागतो तिथे एकत्र कुटुंब हे टीम वर्कचा एक प्रकार म्हणून पाहणे सामान्य गोष्ट आहे असा सल्ला गझलने दिला. आईचे करिअर आणि वैयक्तिक ध्येयांशी तडजोड न करता मुलांना प्रेम आणि संरक्षण मिळेल असे वातावरण निर्माण करण्याच्या महत्त्वावर तिने भर दिला.

हेही वाचा – “एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग

गझल अलघची लिंक्डइन पोस्ट येथे पहा:

https://www.linkedin.com/feed/update/urn:li:activity:7185841869350748160/

गझलच्या भावनिक पोस्टने अनेक नोकरी करणाऱ्या पालकांचा संघर्ष दर्शवला आहे सहसा पालक म्हणून त्यांच्या भूमिकांसह त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असतात.

“तुमच्या मुलासाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्याचे तुमचे समर्पण खरोखरच कौतुकास्पद आहे. एक अद्भुत आई आणि व्यावसायिक गझल अलग म्हणून चमकत राहा,” अशी कमेंट एकाने केली.

पंजाबच्या चंदीगड येथील असलेल्या गझल अलघने २०१६मध्ये पती वरुण अलघ यांच्याबरोबर दिल्लीत मामाअर्थची स्थापना केली. Mamaearth सुरुवातीला बेबी केअर ब्रँड म्हणून लाँच करण्यात आली होता पण नंतर त्याचे रूपांतर एका ‘बॉर्डर ब्युटी अँड पर्सनल केअर’ कंपनीत झाले.