“आई हे आता फार होतंय. सगळं बापू सांगतील तसं आणि तेवढचं करायचं का? हे घर माझं नाही का? मी भाड्याने राहतो का? माझा काहीच हक्क नाही?” मनिष तावातावाने बोलत असताना तिकडे बापू, म्हणजे त्याचे वडील शरदरावसुद्धा तावातावाने येरझऱ्या घालत मनिषच्या नावाने शंख करत होते.

“याच्यासाठी काय नाही केलं? मार्क कमी म्हणुन ओळख काढुन अभियांत्रिकी महाविद्यालयात ॲडमिशन घेतली. पण तिथेही हा सुधारला नाही. नवीन खूळ डोक्यात घेऊन इकडे आला…” असं बरंच काही दोघे बोलत राहिले. बोलत काय, ‘बरळत राहिले’ असं म्हणणं अधिक योग्य होईल! हा सारा तमाशा आशाताई बघत राहिल्या.

shikrapur jategaon robbery marathi news, shikrapur robbery marathi news
पुणे: शिक्रापूर परिसरात दरोडा; ज्येष्ठ महिलेचा खून
teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
students draw class teacher sketch funny video
निरागस चिमुकल्यांनी काढले शिक्षिकेचे चित्र, विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

आताशा हे नेहमीचं झालं आहे. मनिष आणि शरदराव यांचं सुरूवातीपासून कधी पटलंच नाही. शरदराव सुरूवातीपासून कडक शिस्तीचे. सामान जागच्या जागी ठेवण्यापासून वेळ सांभाळणं, इथपर्यंत ठीक होतं, पण चार लोकांशी गरजेपुरतंच बोलणं, एरवी फटकून राहणं, स्पष्ट वक्तेपणाच्या नावाखाली दुसऱ्याला लागेल असं बोलणं, खर्चाचा जिथे गरज नाही तिथेही अगदी पै पै हिशोब ठेवणं, अशा काही गोष्टींमुळे शरदरावांचं नाव नातेवाईकांमध्ये फारसे चांगलं नव्हतं. मनिष नेमका वडिलांच्या स्वभावाच्या उलट. बोलणं म्हणजे अखंड बडबड! शिस्त म्हणजे स्वत:चं आवरणंसुद्धा याच्या जिवावर येणार.

कळायला लागलं तसं बचतीच्या नावाखाली छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याला मन मारावं लागत होतं. मित्रांचं बिनधास्त वागणं आणि घरातलं शिस्तीचं वातावरण, यामुळे मनिषचं बेफिकीरपणे वागणं पुढे वाढत गेलं. ‘आपण आपल्या मनाचे राजे, उगाच कोणाचं काही ऐकून घेत नाही,’ या अविर्भावात मनिषची बंडखोरी वाढत गेली. त्याचे काही निर्णय चुकलेही. पण या काळात नोकरीच्या नावाखाली आर्थिक स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यामुळे मनिषचा बंडखोरपणा वाढत गेला. मग छोट्या छोट्या कारणांमुळे शरदराव आणि मनिष यांच्यात खटके वाढत गेले. या शीतयुध्दात आशाताईंच्या मनाचा मात्र कोंडमारा वाढत गेला.

आता आजचंच बघा- नुकतंच लग्न झालेल्या मनिषला पत्नी सुमेधाला घेऊन बाहेर फिरायला जायचं होतं आणि इकडे शरदराव घरातल्या खोळंबलेल्या कामांची यादी, काय आणि कुणामुळे राहिलं, याची टेप वाजवत होते. मनिष आणि सुमेधा तयार होऊन बसलेले. शरदरावांच्या बडबडीमुळे मनिषचा पारा चढत गेला. शब्दाने शब्द वाढत होता.

ते सर्व ऐकता ऐकता आशाताई भूतकाळात हरवल्या. लग्न झाल्यावर नव्या नवरीची त्यांची स्वप्नं शरदरावांच्या शिस्तीत हरवली. एकत्र कुटुंबात पै पै चा हिशोब जमवत सगळ्या हौसेला त्यांनी फाटा दिला. शरदरावांचं सतत टोचुन-कुजकं बोलणं ऐकून कंटाळलेल्या आशाताईंचा सगळ्यांशी संवाद हरवला. यंत्रवत, साचेबध्द आयुष्य जगत असताना मनिषचा जन्म झाला.

घरातल्या प्रत्येकाच्या तालावर नाचताना आशाताईंचा जीव मेटाकुटीला यायचा. मनिष आणि शरदराव यांची संवादाची घडी बसवण्यात आशाताई खूप प्रयत्न करूनही सपशेल अपयशी ठरल्या. लहानपणी तो लहान म्हणून आणि मोठेपणी मोठा म्हणून मनिषच्या वाटेला सतत वडिलांची बोलणीच आली. शरदरावांचं म्हणणं असे, की “शून्यातून मी विश्व निर्माण केलं, ते असं मातीमोल होण्यासाठी का? तुम्हाला तुमच्या मनासारखं वागू दिलं तर घराची शिस्त बिघडेल.” त्यांची भावना बरोबर असली तरी शब्द जहरी असत. मग सगळं संवादच बिनसायचा. मनिष आणखी आणखी विरोधात जायचा आणि त्यामुळे त्याचे चांगले गुण किंवा त्यानं मन मारलेलं शरदराव समजून घ्यायचे नाहीत.

आशाताईंच्या मनाची घुसमट मात्र या दोघांनीच काय, कोणीच कधी समजून घेतली नाही. आशाताई त्यांच्या भांडणात काहीही बोलल्या तरी दोघांच्या तोंडी एकच वाक्य असे- “तू त्याचीच/ त्यांचीच बाजू घेणार गं! माझी कशाला घेशील?” ही दरी भरण्याचा प्रयत्न म्हणजे नव्या वादाची ठिणगी हे आशाताईंना आता कळून चुकलं होतं. काही बोलताही येईना आणि भांडण बघवेनाही, अशी त्यांची गत व्हायची.

आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी होणारी आशाताईंची घुसमट त्यांनाच असह्य झाली असतांना यावर पर्याय काय हा भुंगा सतत त्यांच्या डोक्यात होता. मनिषचं लग्न ठरलं, तसं त्यांनी यावर आपल्या परीनं एक पर्याय मनिषसमोर मांडला. “मनिष तू कमावता आहेस. भाड्यानं का होईना, तुझं घर घे. तुझ्या बायकोचीही काही स्वप्नं असतील. तिचा संसार तिला नीट करू दे. काही लागलं तर आम्ही आहोत मदतीला.” मनिषला हा पर्याय पसंत नव्हता. एकतर आईला सोडून जाणं त्याच्या जीवावर आलं होतं आणि वडिलोपार्जित घर असताना भाड्याच्या घराचा खर्च त्याला मोठा वाटत होता.

याची कुणकुण शरदरावांना लागलीच. त्यांनी त्यावर वेगळीच भूमिका घेतली. “घरी यायच्या आधीच सुनेने रंग दाखवले! भिकेचे डोहाळे लागलेत या दोघांना. खुशाल जा! बाहेर गेलात की दुनिया कळेल.” असं म्हणत त्यांनी मनिषला डिवचलं. आधी शांत राहण्याच्या प्रयत्नात असलेला मनिष मग वडिलांशी बोलताना हमरीतुमरीवर आला, आशाताई पुन्हा बापलेकांच्या भांडणात ओढल्या गेल्या.

हे सत्र सुरूच राहिलं. आणि कदाचित पुढेही सुरू राहील. बाप आणि मुलगा यातला प्रत्येक जण आपलं खरं करत असताना या आईची ओढाताण कोणी लक्षात घेईल का? तुमच्या घरातसुद्धा असंच काही घडतं का?…

lokwomen.online@gmail.com