-चारूशीला कुलकर्णी

“गावकुसाबाहेरील आमची वस्ती तशी बदनामच. कोणी कधीही यावं… बाईपण उपभोगावं… चार दीडक्या तोंडावर फेकावं आणि निघून जावं… अशी या वस्तीची ओळख! ही ओळख आम्हाला बदलायचीय, त्यासाठी प्रयत्न करतोय… पण समाज आजही आम्हाला स्वीकारायला तयार नाही. आमच्या हातची वस्तू खरेदी करायला तयार नाही…” ही सल आहे सलमाची.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान

नाशिक शहराचा ‘रेड लाईट एरिया’ म्हणून बदनाम असलेला कोपरा. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा एक समूह या ठिकाणी आहे. समूहातील काही स्त्रिया आता वृध्दत्वाकडे झुकलेल्या आहेत. धंदा होत नसल्यानं हलाखीची परिस्थिती त्यांची. त्यांपैकी एक सलमा. सलमाचा भूतकाळही या व्यवसायात येणाऱ्या इतर अनेक स्त्रियांसारखाच. पण तिला त्याची फारशी खंत वाटत नाही. पण हे जिणं आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये यासाठी मात्र तिची धडपड सुरू आहे. समाजात वावरताना मुलांनी ‘मेरी अम्मा’ अशी ओळख अभिमानानं करून द्यावी ही तिची अपेक्षा. त्यासाठी हे सारे प्रयत्न. या व्यवसायातल्या वयस्कर स्त्रियांनी एकत्र येऊन मेणबत्त्या, फिनाईल तयार केलं. पण या वस्तूंना या स्त्रियांचा हात लागलाय हे पाहून या वस्तू कोणी विकतच घेतल्या नाही. अखेर मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये त्यांनी फिनाईलची विक्री केली, असं कुंटणखान्याच्या मालकीण आशाबाई सांगतात.

आणखी वाचा-समुपदेशन : तुमचंही होतं घरात सँडविच?

“धंद्यापेक्षा या कामातून कमाई कमी होते. खर्चबी निघत न्हाय, म्हणून आपला धंदाच बरा असं म्हणुन बायका पुन्हा इकडं वळल्या,” असंही आशाबाई म्हणतात. करोनाकाळात सारं काही थंडावलं. दोन वेळच्या जेवणाची मारामार व्हायला लागली तशा स्त्रिया पडेल ते काम करू लागल्या. धुणं, भांडी, लादी पुसणं. आता सारं रुळावर येतं असताना पुन्हा असं काही झालं, तर त्यावर उपाय असावा म्हणून इथल्या सामाजिक संस्थेच्या मदतीनं मागील दोन वर्षांपासून या स्त्रियांच्या पुर्नवसनासाठी काही व्यवसाय प्रशिक्षणं दिली जात आहेत. ब्युटी पार्लर, शिवणकाम, कागद-कापडापासून पिशव्या बनवणं, फिनाईल तयार करणे, हॅण्डमेड दागिने तयार करणं, याचा त्यात समावेश आहे. या प्रशिक्षणानंतर यातील काही स्त्रियांनी आपल्या कमाईतून पार्लर आणि अन्य व्यवसाय सुरूही केले. पण ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांचं काय? या प्रश्नाला उत्तर म्हणुन संस्थेनं पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला. स्त्रियांचा बचत गट तयार करून त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम जमा करत दहा हजार रुपयांचं भांडवल उभं केलं. दुसऱ्या एका सामाजिक संस्थेच्या मदतीनं त्यांना सॅनिटरी नॅपकिन, हॅण्डमेड दागिने बनवणं, आदी प्रशिक्षण दिलं गेलं. या उत्पादनाला तेथील देवी भद्रकालीचं नाव देण्यात आले.

आणखी वाचा-१५ चित्रपटांमध्ये काम करून UPSC साठी सोडली फिल्म इंडस्ट्री, पाच अपयशानंतर झाली IAS अधिकारी

सुरूवातीच्या काही दिवसांत त्यांचं भांडवल सुटलंही, पण पोलिसांच्या सातत्यानं होणाऱ्या छाप्यांमुळे कुंटणखाने बंद पडले. आता ज्या स्त्रिया या ठिकाणी राहतात. त्यांनी बनवलेल्या बांगड्या, कानातली आणि अन्य काही वस्तू या संस्थेच्या कार्यालयात विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. संस्थेस भेट देणाऱ्यांकडून त्या विकत घेतल्या जातात, एवढंच काय ते विकलं जातं. बाकी ओळखीतून कोणी काही उधारीवर घेऊन जातं, असं रेश्मा सांगते.

‘धंदेवाली’ ही ओळख बदलून व्यावसायिक आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून आम्हाला ओळखा, एवढीच अपेक्षा इथली प्रत्येक जण व्यक्त करते.

lokwomen.online@gmail.com