-डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“शांभवी, मी आज तुझ्यासोबत प्रदर्शन बघायला येत नाहीये, प्लिज तू दुसऱ्या कुणालातरी सोबत घेऊन जा.” सुमेधा जेव्हा हे शांभवीला सांगायला आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील काळजी शांभवीला दिसत होती. एरव्ही नवीन प्रदर्शन, सेल असला की उत्साहानं शांभवीला घेऊन जाणारी सुमेधा आज उदास दिसत होती. काहीतरी चांगलंच बिनसलंय हे शांभवीच्या लक्षात आलं. तिनं विचारलं, “सुमेधा, काय झालंय, मला सांगशील?”

asaduddin owaisi navneet rana akbaruddin
“मी माझ्या भावाला सांगितलं तर…”, असदुद्दीन ओवैसींचा नवनीत राणांना इशारा; म्हणाले, “कोणाच्या बापाला…”
Ajit pawar on sharad pawars
“८४ वर्षांच्या योद्ध्याला तुम्ही लढायला लावताय”, अजित पवारांची शरद पवार गटाच्या नेत्यांवर टीका; म्हणाले “त्यांना बोलताना…”
Make healthy sorghum idli for breakfast
मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात अशी बनवा ज्वारीची हेल्दी इडली; नोट करा साहित्य अन् कृती
pune crime news, young man attempted suicide at police station
पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Father-daughter love
बाप असावा तर असा…! लेकीच्या घटस्फोटानंतर वाजत-गाजत आणलं घरी! वडिलांच्या ‘या’ कृतीचा समाजाने का घ्यावा आदर्श?
In Nagpur tweezers are used to prevent the baby from falling asleep during the day
धक्कादायक! बाळाला दिवसा झोप येऊ नये म्हणून काढायची चिमटे…
Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा

आपल्या घरातील गोष्टी बाहेर कशाला सांगायच्या असं तिला वाटत होतं, पण शांभवी केवळ तिची मैत्रीण नव्हती, तर तिला नेहमीच योग्य मार्गदर्शन करणारी दिशादर्शकही होती.

“शांभवी, सुधीर आणि सारंग या बापलेकामध्ये हल्ली वारंवार वाद होत आहेत. आणि त्याचाच मला त्रास होतो आहे. सुधीरला वाटतं, सारंग त्याच्याशी बोलत नाही, मोकळेपणाने सर्व सांगत नाही. एम.बी.ए. झाल्यानंतर त्यानं सुरुवातीला कुठंतरी नोकरी करावी अशी सुधीरची अपेक्षा होती, त्याच्या ओळखीतून तो सारंगसाठी प्रयत्नही करीत होता, पण सारंगला नोकरी करायचीच नाहीए, ‘तुम्ही माझ्यासाठी काहीही करू नका,’ असं त्याचं म्हणणं आहे, सारंगने आता त्याच्या मित्रांसोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. पण त्यानं पार्टनरशिपच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय ठरवलं आहे? व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे? तो व्यवसायासाठी किती वेळ देणार आहे? याबाबत त्यानं बाबांशी बोलावं अशी सुधीरची अपेक्षा असते.

आणखी वाचा-मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म ते आज ४१.०७ कोटींच्या कंपनीच्या अध्यक्ष, फोर्ब्सच्या यादीतील सोमा मंडल कोण?

आपल्या आयुष्याचं त्यानं नियोजन करावं, याच वयात गुंतवणुकीची सवय लावून घ्यावी, लग्न केव्हा करायचं याबाबत नियोजन करावं, घराकडं,नात्यांकडंही त्यानं लक्ष द्यावं आणि या सर्व बाबतीत सारंगने बाबाचं मार्गदर्शन घ्यावं, त्यांच्या अनुभवांचा उपयोग करून घ्यावा, असं सुधीरला वाटतं आणि सारंग यातील काहीच करत नाही. ‘अडचण आली तर मी तुमच्याशी बोलेन, माझे निर्णय मला घेऊ देत, त्यात तुम्ही लक्ष घालू नका’ असं त्याचं म्हणणं असतं. बाबा त्याच्याशी काही बोलायला गेले तर ते सतत लेक्चर देतात असं त्याला वाटतं, तो त्यांच्याशी बोलणंच टाळतो. त्यांच्याबद्दल त्याला नक्कीच आदर आहे, पण त्याच्या क्षेत्रात त्याला बाबांची घुसखोरी नकोय. ‘माझे विश्व मला निर्माण करायचे आहे’असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याच्या रस्त्यावर काटेकुटे/अडथळे नकोत,कुणीही त्याची फसवणूक करू नये असं त्याच्या बाबाला वाटतंय, मला बाप म्हणून सुधीरची कळकळ समजतीये आणि सारंगचाही मुद्दा पटतोय. खरं तर दोघांच्यात विनाकारण वाद होतात. सुधीरची चिडचिड वाढते आणि सारंगचा अग्रेसिव्हपणा वाढतो तेव्हा मला कुणाचीच बाजू घेता येत नाही आणि त्याचाच मला त्रास होतोय. ही सँडविच सिच्युएशन कशी सांभाळू? दोघांना कसं समजावून सांगू?”

आणखी वाचा-खडतर परिस्थिती, प्रशिक्षणादरम्यान वडिलांचं निधन, IAS अधिकारी रितिका जिंदलचा प्रेरणादायी प्रवास

शांभवीला सुमेधाच्या अस्वस्थतेचं कारण लक्षात आलं. ती म्हणाली, “सुमेधा,तुझ्यासारखी अवस्था अनेक स्त्रियांची होते. पतीच्या बाजूनं बोलायचं की मुलाच्या बाजूचं समर्थन करायचं हे कळतंच नाही, परंतु पत्नी आणि आई या दोन्ही भूमिका निभावताना कोणालाही न दुखावता मध्यस्थाची भूमिका घ्यावी लागते. सुधीरला एवढंच समजावून सांग, की सारंगशी वर्तमानात बोल. त्याच्या भूतकाळाकडं जाऊ नकोस अथवा भविष्याबद्दल बोलू नकोस. कारण अशा वादात नेहमी मुलाचं काही चुकलं तर, ‘तरी मी तुला आधी सांगत होतो, पण तू माझं ऐकलं नाहीस’ किंवा ‘आत्ताच असं वागतोस तर भविष्यात तुझी काय वाट लागेल’ असे शब्द वापरले जातात आणि मुलं दुखावली जातात आणि त्यांच्या मनात पालकांबद्दल ‘हे असेच आहेत, ते मला कधीच समजावून घेऊ शकत नाहीत.’ असा समज निर्माण होतो. तू सारंगलाही समजावून सांग की त्यानं बाबांशी बोलताना कोणतेही पूर्वग्रह मनात ठेवून बोलू नयेत.

एकमेकांची बाजू त्यांनी समजावून घ्यावी यासाठी तुला दोघांशीही स्वतंत्रपणे बोलावं लागेल. तूच हतबल झालीस, तू तुझं मानसिक स्वास्थ्य गमावलसं तर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक चिघळत राहील. दोघांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुला कौशल्याने परिस्थिती हाताळावी लागेल.”

शांभवीशी बोलल्यानंतर सुमेधाला अनेक गोष्टी समजल्या आणि या ‘सँडविच सिच्युएशन’ला कसं सामोरे जायचं याचं नियोजन तिनं सुरू केलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)