आरती कदम

‘लस्ट स्टोरीज- २’ एकूणच लोकांना आवडो न आवडो, पण त्यातली ‘टेस्ट ड्राइव्ह’चा सल्ला देणारी आजी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करून गेली हे नक्की. या आजीचा, जोडप्यांनी लग्नाआधी सेक्स करून ‘सेक्स्युअल कम्पॅटिबिलिटी’ अर्थात एकमेकांना शारीरिकदृष्ट्या पूरक आहोत ना, हे पाहण्याचा सल्ला तिच्या नव्या पिढीतल्या नातीलासुद्धा लाजवणारा असेल तर इतरांची काय कथा. अर्थात सिनेमातली ही नात आजीचा सल्ला मानते आणि आपल्या बॉयफ्रेंडबरोबरची ‘कम्पॅटिबिलिटी’ अनेकदा अजमावून पाहतेच. ते पाहता आणि एकूणच सेक्सविषयक आजकालचे प्रश्न पाहता ती पाहणे ही जोडप्यांसाठी गरजेची आहे, पण ठरवून केलेल्या लग्नांमध्ये अर्थात ॲरेंज मॅरेजमध्ये हे शक्य होईल का, हा आपल्याकडे आजच्या घडीला तरी प्रश्नच आहे.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?

आताच्या पिढीत अगदी कॉलेज जीवनातच सुरू होणाऱ्या ‘बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड’च्या जमान्यात सेक्स हा काही अगंबाई अरेच्चा!चा विषय नाही. पण तो काही कम्पॅटिबिलिटी वा एकमेकांना पूरक आहोत का, हे बघण्यासाठी नक्कीच होत नाही. तिथं एकमेकांचं शारीर आकर्षण हेच महत्त्वाचं! ‘आराधना’ या चित्रपटात राजेश खन्ना-शर्मिला टागोरने तर ते ७० च्या दशकातच ‘रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना’ गात सांगून टाकलंय. आगीसमोर लोणी वितळणारच वगैरे वगैरे तर आहेच. लग्नापूर्वीची ही ‘लस्ट’ लग्नानंतर मात्र गरज मानून टाकलेली असल्याने पूर्वीच्या काळी तर लग्नपत्रिकेवर म्हणे, ‘याचे आणि हिचे शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे’ अशा आशयाचाच थेट मामला असायचा. नंतरच्या काळात मात्र शारीरगरजेचं इतकं उघडंवागडं प्रदर्शन करणं आणि एकूणच सेक्स हा बंद दरवाजामागचा विषय मानला गेल्याने त्या पत्रिकाही बदलल्या आणि साहजिकच त्या गरजेचं जाहीरपणे व्यक्त करणं कुजबुजीत बदललं. खरं तर आपल्याकडे विवाह पद्धती याच मुख्य उद्देशाने निर्माण झाली, त्यातूनच पुढे कुटुंबव्यवस्था तयार झाली आणि ते निभावणं गरजेचं हेच संस्कार लहानपणापासून केले गेल्याने अनेकदा ही कम्पॅटिबिलिटी नसल्याने निर्माण होणारे प्रश्न ‘अंडर द कार्पेट’ राहात गेले. मात्र आज काही प्रमाणात त्यावर बोलणं सुरू झालं असल्याने लैंगिक समस्याविषयक डॉक्टरांकडे, समुपदेशकांकडे, तज्ञांकडे रुग्णांची लागणारी रीघ याच ‘कम्पॅटिबिलिटी’च्या गरजेकडे बोट दाखवते.

आणखी वाचा-विवाह समुपदेशन: जोडीदार – कल्पनेतील आणि वास्तवातील! 

तरी आजही सेक्स हा विषय असा कुजबुजत बोलण्याचा विषय मानला जात असल्याने ‘लस्ट २’ मधली आजी जेव्हा ‘टेस्ट ड्राइव्ह’ आणि ‘ऑरगॅझम’साठी माऊंट फुजीचा उल्लेख करते तेव्हा आजीपण भारी देवा, असं कित्येकांना वाटू शकतं. पण असं वाटणं म्हणजे फॅण्टसी आणि प्रत्यक्ष होणं यातली वस्तुस्थिती आपल्या देशात तरी शक्य आहे का, हा मुद्दा आहेच. आर. बल्की यांनी दिग्दर्शित केलेली आणि नीना गुप्ता यांनी साकारलेली ही आजी जेव्हा लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या आपल्या नातजावयाच्या आई-वडिलांसमोर आणि आपला मुलगा आणि सुनेसमोर या ‘टेस्ट ड्राइव्ह’ अर्थात लग्नाआधी सेक्सचा उल्लेख करते तेव्हा पन्नाशी पार केलेल्या दोन्ही जोडप्यांना ‘दे माय, धरणी ठाय’ असंच होतं. आईला म्हातारचळ लागलंय, ती काहीही बरळतेय असं म्हणून तिला गप्प करायचा प्रयत्नही तिच्या लेकाकडून होतो खरा, पण ती स्पष्टच सांगते, “हे बघ, नवरा-बायकोच्या नात्याला बांधून ठेवण्यासाठी सेक्स हाच महत्त्वाचा धागा आहे. त्यांच्या आवडीच्या अनेक गोष्टी असतील, जसं त्यांना चायनीज खायला आवडतं, ट्रेकिंग करायला आवडतं, अगदी सुफी गाणी ऐकायला आवडतात, या कॉमन गोष्टी चांगल्याच, पण जेव्हा हे दोघं पूर्ण दिवस नोकरी करून दमून थकून घरी येणार तेव्हा त्या दोघांना एकमेकांशी बांधून ठेवायला सेक्सच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या एकमेकांना पूरक आहात का हे पाहायला पाहिजे. नाही तर लग्नानंतरच आयुष्य समस्यांचं असेल ना.” असं म्हणत ही आजी गाडी घेण्यासाठी आपण टेस्ट ड्राइव्ह घेतो तसं लग्नाआधी सेक्स करून पाहिला पाहिजे याचा पुनरुच्चार करत राहते. आजीचा हा सल्ला तिच्या मुला-सुनेलासुद्धा अनकम्फर्टेबल करत असेल तर एकूणच भारतीयांची मानसिकता त्या चित्रपटांने अचूक पकडलीय असं म्हणायला हरकत नाही.

आणखी वाचा- नातेसंबंध: तुमचं नातं फक्त शारीरिक आहे का…?

पण समाजाच्या मानसिकतेचा हा मुद्दाच महत्त्वाचा आहे. मुळात असं लग्नाआधी शारीरिक पूरकता शोधणं गरजेचं आहे हेच जिथं मान्य नाही तिथं लग्न ठरवताना एकमेकांना पूर्णत: अनोळखी असणाऱ्या त्या दोघांमध्ये शारीरसंबंध जागवण्याइतपत आधी नातं तर तयार व्हायला नको का? शिवाय नवरा-बायकोला बांधून ठेवण्यासाठी नंतरच्या टप्प्यात अनेक गोष्टी निर्माण होतातच. त्यामुळे या आजीने शारीरिक संबंधांची गरज कितीही समजून सांगितली असली तरी आताच्या घडीला तरी ती अनेक प्रश्न निर्माण करून गेली आहे हे नक्कीच!

lokwomen.loksatta@gmail.com