सुमनताईंचा मुलगा ऋषी अमेरिकेतील एका मोठ्या आयटी कंपनीमधे नोकरी करत होता. त्याला भरपूर चांगलं पॅकेज मिळालं होतं. भारतात पाच हजार स्वेअर फूट हक्काची जमीन असावी हे त्याचं स्वप्न होतं. त्याने आईशी चर्चा केली, त्यानुसार सुमनताईंनी जमीन खरेदी-विक्री करणार्‍या एजंटला गाठलं. तो एक महिन्यानंतर सुमनताईंकडे एका प्लाॅटची माहिती घेऊन आला. त्या एजंटसह ताबडतोब प्लाॅट बघायला गेल्या. त्यांना तो प्लाॅट खूपच आवडला. त्यांच्या बोलण्यातून एजंटला त्यांची उत्सुकता कळली होती. या जमिनीच्या याच ग्राहक असणार याची त्याला खात्री पटली. त्याने सुमनताईंशी गोड बोलत, त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेत हा प्लाॅट त्यांच्यासाठी किती चांगला असणार वगैरे पटवून दिलं. त्याचबरोबर हा प्लाॅट आणखी स्वस्त कसा मिळू शकतो त्यासाठी प्लॅन सांगितला.

प्लाॅट मालक अडचणीत असल्यामुळे जो गिर्‍हाइक लगेचच वीस लाख रुपये देईल त्यांना हा प्लाॅट पन्नास लाख रूपयांत मिळणार आहे. आपण घाई केली तर हा प्लाॅट आपल्यालाच मिळेल. नाहीतर आणखी दोन गिर्‍हाइक त्यांच्याजवळ आहेतच. तुम्ही तयार असाल तर मी पुढे तसं बोलतो, असं त्याने सांगितल्यावर सुमनताई लगेचच तयार झाल्या. दोन दिवसांनी तो एजंट एक दोन पेपर्स घेऊन आला. त्यावर सह्या झाल्या. त्यांच्या दृष्टीने जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला होता. एजंट सांगेल तिथे त्यांनी सह्या केल्या होत्या.

diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Sleeping At This Time Reduce Spike In Diabetes Type 2
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?

हेही वाचा… गच्चीवरची बाग: झाडांचे जीवन जलसिंचन

सहा महिन्यांनी ऋषी भारतात आला तेंव्हा त्याने प्लाॅटवर अपार्टमेंट काढायचं ठरवलं. एका नामांकित बिल्डरशी बोलणं सुरू केलं. बिल्डरने कागदपत्रे मागितली. तर सुमनताईंनी त्यांच्याकडची काही कागदपत्रे दिली. बिल्डर कागदपत्रे बघताच म्हणाला, “सुमनताई, त्या एजंटने तुम्हाला फसवलं आहे. प्लाॅट घेताना तुम्ही कुणाचाच सल्ला का नाही घेतलात? प्लाॅटची कागदपत्र अशी नसतात. ऋषी, तू दोन दिवसांनी आईला घेऊन ऑफिसला ये. तुमच्याबाबतीत काय झालं आणि काय करायला हवं होतं हे मी सांगेन. निदान भविष्यात पुन्हा प्लाॅट घेताना अशी चूक तुमच्याकडून होणार नाही.”

सुमनताईंना घेऊन ऋषी त्या बिल्डरच्या ऑफिसमधे गेला. बिल्डरने त्या दोघांना खूप समजावलं.

सुमनताई, तुम्ही जमीन बघितली, पण जमिनीची कागदपत्रे नाही बघितलीत. एजंटने दाखवला तो प्लाॅट तुम्हाला खूप आवडला. त्याने एक-दोन ठिकाणी सह्या करायला सांगितल्या आणि तुम्ही फारसा विचार न करता, कागदपत्रे काळजीपूर्वक न वाचता सह्या केल्यात आणि पैसे देऊन मोकळे झालात. तो एजंट भामटा होता. पैसे घेऊन फरार झाला.”

प्लाॅट घेताना सुमनताईंनी कोणती माहिती तपासून घ्यायला हवी होती?

प्लाॅट खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात-

१) प्लाॅट घेत असताना एखाद्या वकिलाची मदत घ्यावी जे जमिनीच्या कागदपत्रांची खात्री करुन घेतील. जमिनीचा सर्च रिपोर्ट म्हणजे प्लाॅट बाबतचा तीस वर्षांचा दाखला तयार करतील. प्लाॅटचे यलो, ग्रीन झोन पाहतील. प्लाॅटची मोजणी नीट आहे का नाही बघतील.

२) प्लाॅट खरेदी करण्यापूर्वी स्थानिक वृत्तपत्रात तशी जाहीर सूचना द्यावी जेणेकरुन इतर कुणाचा मालकी हक्क असेल तर ते कळू शकेल.

३) जमीन मालक अनिवासी भारतीय असेल किंवा काही कारणास्तव प्लाॅट विक्रीसाठी दुसर्‍याकडे पाॅवर ऑफ ॲटर्नी असते. बर्‍याच वेळा पाॅवर ऑफ ॲटर्नीचे अधिकार काढून घेतलेले असतात. पण जुनीच पाॅवर ऑफ ॲटर्नी दाखवून व्यवहार केले जातात. इथे सावधगिरीने पाॅवर ऑफ ॲटर्नीची कागदपत्रं तपासायला हवेत.

४) प्लाॅटसाठीच्या व्यवहारात कोणत्याही झेराॅक्स पेपर्सवर अजिबात विश्वास ठेऊ नये. विक्रेत्याकडे मूळ कागदपत्रांचा आग्रह धरावा.

५) सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपली आयुष्यभराची रक्कम अशा व्यवहारासाठी वापरत असतो. तेंव्हा अर्जंट व्यवहार कधीच करायचे नाहीत. उलट एजंट जेंव्हा हे अर्जंट आहे, लवकर व्यवहार करायला हवा, असं सांगतात तेव्हा तो व्यवहार करुच नये. अशा व्यवहारात संपूर्ण समाधानकारक खरेदीसाठी कमीत कमी सहा महिन्याचा निवांत वेळ घ्यावा. संपूर्ण चौकशी करावी. मगच पैसे द्यावेत.

प्लाॅट खरेदी करणं म्हणजे पैसे देऊन एखादी वस्तू घरी आणणं नव्हे हे सुमनताईंना पटलं होतं. पश्चातापही प्रचंड झाला होता. त्या एजंटला पकडून पैसे परत मिळवावेत ही एकच आशा मनात ठेऊन बिल्डरच्या ऑफिसमधून त्या बाहेर पडल्या. आता त्या फसव्या एजंटची तक्रार करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यांनी एजंटचा नंबर, फोन काॅल्सचे डिटेल्स, सह्या केलेले कागद एवढ्यावर एका अर्जासह जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार नोंद केली. जवळच्या पोलीस स्टेशनमधे तक्रार केली. ग्राहक तक्रार आयोगाकडेही तक्रार केली. कुठूनही न्याय मिळू दे. मला न्याय हवाय. माझे पैसे परत हवेत हा सुमनताईंचा आक्रोश त्यांना न्याय मिळवून देईल की त्या आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळत राहातील?

ग्राहक राणी… अशा मोठ्या आर्थिक व्यवहारात लक्ष घालताना तो संपूर्ण व्यवहार नीट समजून घेशील. सावधगिरी बाळगळशील. व्यवस्थित अभ्यास करशील. तरच तुझी फसवणूक होणार नाही. शिवाय सामान्य स्त्रीदेखील असे व्यवहार करुच शकते हे सगळ्यांना समजेल.
archanamulay5@gmail.com