आराधना जोशी

दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. आता निकाल लागेपर्यंत जवळपास अडीच तीन महिन्यांचा काळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याचा योग्य उपयोग कसा करून घ्यायचा? एवढ्या मोठ्या सुट्टीत नेमकं काय करायचं असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी दोघांनाही पडतो. पण या एवढ्या मोठ्या सुट्टीचा उपयोग आपल्या करिअर प्लॅनिंगसाठी कसा करून घेता येईल याचा विचार होणं आवश्यक आहे.

right to education latest marathi news, right to education marathi news
शिक्षण हक्क हवा, मात्र पात्र विद्यार्थ्यांसाठीच!
onion crisis central government lifts ban on onion export before lok sabha poll
ही निवडणूकसुद्धा कांद्याची!
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?

गेल्या अनेक वर्षांपासून पालक आणि एक शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधताना लक्षात आलं की, करिअरची निवड कशी करायची याबद्दल अजूनही अनेकांच्या मनात गोंधळ आहे. रिझल्ट लागल्यावर किती टक्के मिळतात किंवा आपले बाकीचे मित्र मैत्रिणी कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतात तिथेच आपणही जाऊ असा विचार आजही अनेक विद्यार्थी करतात. पालकांनाही आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक कोर्सेस व्यतिरिक्त इतर असंख्य अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत याची फारशी कल्पना नसते. खूप कमी पालक आपल्या पाल्याच्या करिअर निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. बाकीचे पालक मुलं सांगतात त्याप्रमाणे वागत असतात. म्हणूनच या मिळालेल्या मोठ्या सुट्टीचा उपयोग पालक आणि पाल्याने उत्तम पद्धतीने करून घेणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा >> मुलं सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतात? प्रश्नांच्या गुंत्यातून त्यांना बाहेर काढायचं की, गुरफटू द्यायचं?

इंटरनेटची मदत घ्या

आज इंटरनेटवर दहावी आणि बारावीनंतरच्या अनेक उत्तमोत्तम अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध असते. ती डोळ्याखालून घालणं, त्यावर पालकांबरोबर चर्चा करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर आपली आवड, एखाद्या विषयात आपल्याला असणारी रुची आणि त्यानुसार असणारे विविध अभ्यासक्रम यांचा शोध घेणं ही पुढची पायरी ही तितकीच महत्त्वाची असते. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जर शक्य असेल तर प्रोफेशनल व्यक्ती किंवा करिअर कौन्सिलरची मदत घ्यावी.

करिअर कॉन्सलिंग करा

करिअर कौन्सिलरची मदत घेतल्यामुळे ॲप्टीट्यूड टेस्टच्या माध्यमातून आपला कल कुठे आहे हे विद्यार्थ्यांना समजून घेता येतंं. त्यानुसार उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती आपल्याला मिळते. त्यातून कोणता अभ्यासक्रम निवडायचा याचा अंतिम निर्णय आपल्या हातात राहतो. याशिवाय याच काळात अनेक ठिकाणी करिअरशी संबंधित प्रदर्शने आणि स्टॉल्स लागतात. याठिकाणी अवश्य भेट द्यावी. तिथे मिळणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची पॅप्लेट्स आणि इतर साहित्य गोळा करा. घरी येऊन त्यावर इतरांशी अवश्य चर्चा करा. या सगळ्या गोष्टींमुळे रिझल्ट लागल्यानंतर नेमकं काय करायचं याबाबत आपल्या हातात किमान ३० ते ३५ अभ्यासक्रमांची यादी तयार असेल.

हेही वाचा >> मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग

पाल्याची आवड लक्षात घ्या

अभ्यासक्रमांच्या निवडीमध्ये पालकांनीही अवश्य भाग घ्यावा. त्यासाठी आपल्या मुलांसोबत चांगला संवाद हवा. नाहीतर आपला पाल्य नेमकं काय करतोय, त्याचा कल, आवड कशात आहे याची पालकांना काहीच माहिती नसते. नंतरच्या काळात पाल्य ज्या अभ्यासक्रमाला जाणार आहे त्याचा एकूण खर्च किती येणार आहे? इतर ठिकाणी जाऊन तो अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असेल तर त्याचा होणारा अतिरिक्त खर्च करण्याची आपली क्षमता आहे का? आपण पाल्याला तिथे एकटे राहू देणार आहोत का? यासाठी आपली मानसिक आणि आर्थिक तयारी आहे का? याचा विचार त्यामुळे पालकांना आधीच करता येतो, त्याप्रमाणे तयारी करता येते. परदेशी शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घ्यावे लागणार असेल तर त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीसाठी हातात पुरेसा वेळ मिळतो.

कोर्सची ‘डिमांड’ पाहा

आपली आवड, कल यानुसार जरी आपण अभ्यासक्रमाची निवड करणार असलो तरी अजून एक मुद्दा विचारात घेण्याची गरज असते ती त्या अभ्यासक्रमाला भविष्यात म्हणजे आपण शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसायासाठी प्रयत्न करू त्यावेळी किती मागणी (डिमांड) आहे याची. अनेकदा चूक अशी होते की ॲडमिशन घेताना ज्या अभ्यासक्रमाची चलती असते त्याचा विचार केला जातो. मात्र पदवी हातात येईपर्यंतच्या काळात त्या अभ्यासक्रमाची मार्केटमधली डिमांड कमी झालेली असते. अशावेळी मनासारखी नोकरीची संधी उपलब्ध झाली नाही तरी डिप्रेशन येऊ शकतं. यासाठीच पुढच्या पाच ते सात वर्षांमध्ये कोणत्या कोर्सला डिमांड असेल याचाही विचार केला जावा.

हेही वाचा >> अहो, तुमचा मुलगा स्वयंपाक करतो? फक्त जेवण नाही, पण ‘हे’ ही शिकवा..

रिझल्ट लागण्याअगोदर विचार करून ठेवलेल्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पर्सेंटेज नाही मिळाले तर काय करायचं? कोणता अभ्यासक्रम निवडायचा यावरही याच सुट्टीत विचार करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे प्लॅन ए फसला तरी प्लॅन बी तयार असलाच पाहिजे. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेत अपेक्षित मार्क नाही मिळाले तर पुढच्या वर्षी ती परीक्षा परत द्यायची की परदेशी (रशिया वगैरे) जायचे हा विचार आधी झाला पाहिजे. या अशा प्लॅनिंगमुळे आपला वेळ, पैसा, शारीरिक आणि मानसिक कष्ट नक्कीच वाचतात. मग पालक – पाल्य दोघेही करणार नं या सुट्टीचा सदुपयोग?