धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. abhijit.belhekar@expressindia.com

बांधवगड सफारी
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील बांधवगड येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

कुआरी पास ट्रेक
हिमालयातील अनेक प्रसिद्ध ट्रेकमध्ये ‘कुआरी पास’ पदभ्रमण मोहिमेचा समावेश केला जातो. या पदभ्रमण मोहिमेचा शोध लॉर्ड क्रुझन रिचर्ड यांनी १९०५ साली लावला म्हणून याला ‘क्रुझन ट्रेल’ असेही म्हणतात. पंधरा हजार फुटांवरून जाणारी ही मोहीम गढवाल हिमालयातील अनेक पर्वतशिखरांमधून जाते. या वेळी नंदादेवी, कामेत, द्रोणागिरी, त्रिशूल, बेरथोली, हाथी घोडी पर्वत, माना, निळकंठ आदी हिमशिखरांचे दर्शन घडते. हिमालयातील निसर्गसौंदर्य, साहस यांची अनुभूती असणाऱ्या या मोहिमेचे हिमगिरी ट्रेकर्सतर्फे आयोजन केले आहे. ११ ते २१ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

बांधवगड अभ्यास सहल
जंगल संवर्धन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या अभ्यासासाठी ‘टायगर ट्रेल्स’तर्फे येत्या ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बांधवगड अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. या पशू-पक्ष्यांचा, वनस्पतींचा अभ्यास, वनसंवर्धन आदी उपक्रमांची माहिती या सहलीत घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी शर्विल शंृगारपुरे (९७६९११९९९४) यांच्याशी संपर्क साधावा.

तिकोना पदभ्रमण
‘आनंदयात्रा’ तर्फे येत्या २४ ऑगस्ट रोजी पवन मावळातील तिकोना किल्ल्यावर भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.
भीमाशंकर पदभ्रमण
‘एसपीआर’तर्फे येत्या २३ आणि २४ ऑगस्ट रोजी भीमाशंकर परिसरात पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

कास पठार – सज्जनगड
पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभ्या खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. या वेळी कुणी फुलांच्या अभ्यासासाठी, कुणी छायाचित्रणासाठी तर कुणी निव्वळ त्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी कासची वाट पकडते. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २० आणि २१ सप्टेंबर दरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९५७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.