मेष
कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. गुरू वंदन करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांचा मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – गडद निळा

वृषभ
कुलस्वामिनी आणि कुलदैवतेचे दर्शन करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावीङ ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
महादेव मंदिरामध्ये एकमुठ तांदूळ अर्पण करणे आणि दर्शन घेणे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – सोनेरी

कर्क
कुलदैवताचे स्मरण करून दिवस आनंदात घालवावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – लाल

सिंह
महादेवाचे आणि कालभैरवाचे दर्शन घेणे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – गुलाबी

कन्या
कुलदैवताचे स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – हिरवा

तुळ
ग्रामदैवतेचे पुजा करावी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – फिकट हिरवा

वृश्चिक
गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. आर्थिक भ्रमण धनु राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम गहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – नारंगी

धनु
आज कुलदैवताचे मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

मकर
कुलदैवताचे स्मरण करावे. दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
ओम श्री आदित्याय नम: या मंत्राचा ११ वेळा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग- निळा

मीन
आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu