6h May Panchang & Rashi Bhavishya: ६ मे २०२४ ला आज मासिक नवरात्री असणार आहे. आज चैत्र मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी रेवती नक्षत्राच्या प्रभावात पार पडेल. आज शिवरात्री असल्याने महादेव भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. शिवरात्री व सोमवारचा योगायोग जुळून आल्याने या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. चंद्रमा आज मीन राशीत स्थित असतील तर आजच्या दिवशी खास असा प्रीती योग जुळून आलेला आहे. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार हे पाहूया..

६ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-छोट्याश्या गोष्टींनी नाराज होऊ नका. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवा. सर्वांशी गोडीने वागाल. कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका. कामाची अचूक आखणी करावी.

8th May Panchang Mesh To Meen Marathi Horoscope Rashi Bhavishya
८ मे पंचांग: अचानक धनलाभ ते भांडणात सहभाग, आज सौभाग्य योगाने मेष ते मीन राशीचे नशीब कसे बदलेल?
Shukra Nakshatra Parivartan
४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या धन व बँक बँलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ? शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे नशीब अचानक पालटणार
3rd may 2024 shukravar rashi bhavishya mesh to mean zodiac signs daily marathi horoscope in marathi
३ मे पंचांग: तीर्थयात्रेचा योग ते अचानक धनलाभ; ‘या’ राशींचा शुक्रवार जाईल आनंदात, वाचा तुमचं राशिभविष्य
Hanuman Jayanti Wishes 23rd April Rashi Bhavishya Mesh To Meen
हनुमान जयंतीला मारुतीराया मेष ते मीनपैकी कुणाला देणार आर्थिक बळ; तुमच्या राशीच्या नशिबात आज काय घडेल?
Guru Asta 2024
आजपासून ‘या’ ५ राशींवर देवगुरुंची अपार कृपा? अडकलेले पैसे मिळू शकतात परत; भाग्यवान राशी कोणत्या?
Shani Copper Effect In Gochar Kundali Of These Three Rashi Saturn Effect of Sadesati
शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?
7th May Panchang Amavasya Mesh To Meen Horoscope
७ मे पंचांग: मिथुन व कन्या राशीला लाभ; वृषभ राशीचे आयुष्य ‘असं’ बदलणार, अमावास्येला तुमच्या राशीच्या नशिबात काय?
25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद?

वृषभ:-तुमच्यातील प्रतिभा जागृत ठेवा. मुलांबाबत शंका मिटतील. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. उत्तम वाहन सौख्य लाभेल. गुरुकृपेचा लाभ घेता येईल.

मिथुन:-कामानिमित्त प्रवास करावा लागेल. सतत कार्यमग्न राहाल. खिशाला कात्री लागू शकते. लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल
.
कर्क:-मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. काहीसे हट्टीपणाने वागाल. नवीन लोक संपर्कात येतील.

सिंह:-उष्णतेचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. जबाबदारी निभावून नेता येईल.

कन्या:-प्रवासातील क्षुल्लक अडचणी टाळाव्यात. पाय खेचणार्‍या लोकांकडे लक्ष ठेवावे. अपचनाचा त्रास जाणवेल. कामातील तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्यात. प्रलोभनाला भुलू नका.

तूळ:-आरोग्याकडे लक्ष ठेवावे. नवीन गुंतवणुकीला वाव मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रेस जुगारा पासून दूर राहावे.

वृश्चिक:-जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आहे. घरातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे. प्रवास जपून करावा. घरगुती कामात अधिक वेळ अडकून पडाल. आर्थिक गणित नव्याने मांडावे लागेल.

धनू:-हातातील अधिकार योग्य ठिकाणी वापरा. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील अरसिकता काढून टाकावी.

मकर:-कामानिमित्तचा प्रवास सावधानतेने करावा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवावे. भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगावी. तिखट व तामसी पदार्थ खाल.

कुंभ:- पित्त विकाराचा त्रास संभवतो. क्षुल्लक कारणाने डोकेदुखी वाढू शकते. घाईघाईने कोणतेही काम करू नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. नवीन लोकांच्यात मिसळावे.

हे ही वाचा<< ३१ मेपर्यंत ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; पहिल्या दिवसापासून कुंडलीत मोठे बदल, लाभ कुणाला? १२ राशींचे भविष्य वाचा

मीन:-सामुदायिक वादापासून दूर राहावे. मुलांच्या गोष्टी विरोधी वाटू शकतात. मानसिक चंचलता जाणवेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. अनाठायी खर्च टाळावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर