प्रसारमाध्यमे ही अमेरिकी जनतेची शत्रू आहेत असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. वृत्तपत्रे व दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे, अमेरिकेतील अनेक प्रसारमाध्यमांनी ट्रम्प प्रशासनाच्या कारभारावर टीका केली होती. द फेक न्यूज मीडिया म्हणजे प्रसारमाध्यमे ही केवळ माझी शत्रू नाहीत तर अमेरिकी जनतेची शत्रू आहेत असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यांनी सीएनएन, सीबीएस, एबीसी, एनबीसी न्यूज, न्यूयॉर्क टाइम्स यांचा उल्लेख केला.

माझे प्रशासन हे अगदी छान चालणाऱ्या यंत्रासारखे असून व्हाईट हाऊसमध्ये कुठलाही गोंधळ नाही पण अप्रमाणिक माध्यमे मात्र तशा बातम्या देऊन आमच्या प्रशासनावर टीका करीत आहेत.

israil
लेख: गाझा संहार : अमेरिका काय करणार?
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Indian-American Congressman Shri Thanedar
“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका

दूरचित्रवाणी व वृत्तपत्रात व्हाइट हाऊसमध्ये गोंधळ असल्याच्या बातम्या पाहायला मिळतात तेव्हा व्यथित व्हायला होते असे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी ट्विटर व फेसबुक यांचा वापर वृत्तपत्रातील बातम्यांना प्रत्युत्तरे देण्यासाठी केला आहे. बहुतांश लोक माझ्या प्रशासनावर समाधानी आहेत व २० जानेवारीपासूनची कामगिरी लोकांना चांगली वाटत आहे असा दावा त्यांनी केला.

विरोधी पक्ष व प्रसारमाध्यमे मात्र ट्रम्प यांच्या कारभारावर नाराज असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करणारे जे ट्विट टाकले आहे ते काही तासातच रिट्विट होऊन व्हायरल झाले. त्याचे २८ हजार वेळा रिट्विट झाले असून ५३ हजारवेळा ते फॉरवर्ड झाले आहे तर ८५ हजार लोकांनी त्याला पसंती दिली आहे. ट्रम्प यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली ती चांगली झाली असा दावा करण्यात आला असून प्रसारमाध्यमांनी खोटय़ा बातम्या दिल्या असे म्हटले आहे.