ईव्हीएम मशील हॅक करून दाखवण्याच्या निवडणूक आयोगाच्या आव्हानावर शुक्रवारी फक्त आठ राजकीय पक्षांनी आपलं उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोगाने आव्हान स्वीकारण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. प्रत्युत्तरात फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच निवडणूक आयोगाचे आव्हान स्विकारले आहे. तर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याची ओरड केलेल्या आम आदमी पक्षाने मात्र यावेळी हात वर केले. खरंतर ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून भाजपने निवडणूका जिंकल्याचा आरोप करण्यात आप आणि काँग्रेसचा पुढाकार होता. पण निवडणूक आयोगाने दिलेल्या आव्हानात या दोन्ही पक्षांनी यात सहभागी होणं टाळलं आहे. राष्ट्रवादी पक्षाने ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या आव्हानासाठी आपले तीन प्रतिनिधी नियुक्त केल्याचं निडवणूक आयोगाने सांगितलं आहे. या आव्हानात पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथून ईव्हीएम मशीन मागविल्या जाणार आहेत.

 

mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”

‘आप’ने निवडणूक आयोगाचं हे आव्हान एक नाटक असल्याचं सांगत यात आम्ही सहभागी होणार नाही, असं जाहीर केलं आहे. याशिवाय, कोणतेही नियम न लादता स्वतंत्रपणे ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याच्या आश्वासनापासून निवडणूक आयोग मागे का हटत आहे? असा सवालही आम आदमी उपस्थित केला आहे.

”निवडणूक आयोगाचं हे आव्हान नसून एक नाटक आहे. या नाटकात आम्हाल भाग घ्यायचा नाही.”, असे आपचे नेते गोपान राय यांनी सांगितले. दिल्ली सरकारचे मंत्री सौरव भारद्वाज यांनी थेट विधानसभेत प्रात्यक्षित दाखवत ईव्हीएम मशीन कसं हॅक करता येऊ शकतं याचा दावा केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करणं कोणत्याही परिस्थितीत अशक्य असल्याचं ठामपणे सांगितलं होतं.