28 May 2016

पेट्रोल दीड रुपयांनी, डिझेल ४५ पैशांनी महाग

पेट्रोलच्या दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून लिटरमागे दीड रुपये तर डिझेलच्या दरात लिटरमागे ४५ पैशांची

नवी दिल्ली | February 16, 2013 4:08 AM

पेट्रोलच्या दरात  शुक्रवारी मध्यरात्रीपासून लिटरमागे दीड रुपये तर डिझेलच्या दरात लिटरमागे ४५ पैशांची वाढ करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतींच्या तुलनेत देशांतर्गत पेट्रोलचे दर वाढवण्यात आले असून डिझेलच्या दरात ठरावीक कालावधीत किरकोळ वाढ करण्याच्या धोरणानुसार त्याचे दर वाढवण्यात आल्याचे तेल कंपन्यांतील सूत्रांनी सांगितले. ही दरवाढ स्थानिक विक्रीकर किंवा व्हॅट गृहीत न धरता करण्यात आली असून प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेलसाठी ग्राहकांना जाहीर दरवाढीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
मुंबईतील नवे दर
पेट्रोल ७५.९१
डिझेल ५४.२८
ठाण्यातील नवे दर
पेट्रोल ७४ .८१
डिझेल ५४.१९

First Published on February 16, 2013 4:08 am

Web Title: petro diesel costly