बॉलिवूडचा खिलाडी कुमार आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी लवकरच एकत्र काम करणार आहेत अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात होत आहे. आरोग्याशी निगडीत ‘जान बचाओ’ या मोहिमेसाठी हे दोघं एकत्र येणार आहेत. या मोहिमेसाठी अक्षय कुमार एक व्हिडिओ शूट करणार आहे. या व्हिडिओ शूटचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार आहेत.

‘जान बचाओ’ नावाचे हे अभियान लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्यस्त कारभारात जेव्हा लोक आपल्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक आजारांचा आणि रोगराईचा शिकार होतात. यावेळी लोकांच्या आरोग्याशी निगडीत सल्ला देणारा एक व्हिडिओ बनवला जात आहे. ज्यात अक्षय कुमारला ‘जान बचाओ’ मोहिमेचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनवले आहे. भामला फाउण्डेशनचे अध्यक्ष आसिफ भामलाने अक्षयसोबत बृहन्मुंबई नगर निगमचा (एमसीजीएम) आरोग्य अॅम्बेसिडर म्हणून करार केला आहे. ‘पीके’, ‘थ्री इडियट’, ‘मुन्ना भाई’ सिनेमाच्या मालिका आणि अनेक जाहिरातींचे दिग्दर्शन करणारे राजू हिरानी या लघुपटाचेही दिग्दर्शन करणार आहे.

Prajwal Revanna Sex scandal of Karnataka Deve Gowda family
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या नातवासाठी देवेगौडांनी सोडला होता मतदारसंघ; कुटुंबात राजकीय दुफळी
Arun Govil Hema Malini BJP Rajput anger Uttar Pradesh
हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?
Giriraj Singh interview issue of Kashi Mathura and Ayodhya Lok Sabha Election 2024
काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप
Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..

दरम्यान, सैन्याप्रती आपली जबाबदारी जाणणाऱ्या खिलाडी कुमारने सीमा सुरक्षा दलातील शहीद जवान गुरनाम सिंगच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. खिलाडी कुमारने शहीद गुरनाम सिंगच्या कुटुंबियांना ९ लाख रुपयांची मदत देण्याचे ठरवले आहे. ज्या ठिकाणी शहीदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या फक्त घोषणाच केल्या जात आहेत आणि या मदत निधीवरुनही राजकारण रंगत आहे त्याच ठिकाणी खिलाडी कुमारने दिलेला हा मदतीचा हात अनेकांनाच परिस्थीतीचे गांभीर्य सांगून जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कथुआ या पाकिस्तानलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत असताना जखमी झालेले जवान गुरनाम सिंग यांचा उपचार घेत असताना जम्मूतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. २६ वर्षांच्या गुरनाम सिंग यांनी शुक्रवारी सीमेवर दहशतवाद्यांनी केलेल्या स्नायपर हल्ल्याचा प्रतिकार केला होता व त्यात ते जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.