बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बरेच नवे चेहरे पाहायला मिळाले. मुख्य म्हणजे या नव्या चेहऱ्यांनी फार कमी वेळातच त्यांचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेता वरुण धवन. ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बी- टाऊनमध्ये पदार्पण करणारा वरुण लवकरच ‘जुडवा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तो सहकलाकार तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत अनेक ठिकाणी फिरत आहे. सहकलाकारांसोबतच्या विशेषत: तापसीसोबतची वाढती जवळीक वरुणच्या प्रेयसीसाठी डोकेदुखी ठरत आहे.

‘द एशियन एज’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वरुणची प्रेयसी, नताशा दलाल हिला तापसीसोबतचं त्याचं नातं खटकंत असून तापसीपासून दूर राहण्याची ताकीद तिने वरुणला दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नताशाचा चित्रपटसृष्टीशी फारसा संबंध नाही. त्यामुळे गॉसिप आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित बातम्यांवर ती सर्वसामान्यांप्रमाणेच व्यक्त होते. जेव्हा वरुण आणि आलियाचं नाव जोडलं गेलं, तेव्हाही तिने वरुणला आलियासोबत चित्रपट करू नको, असे सांगितले होते. आता तीच गोष्ट तापसीच्या बाबतीतही घडत आहे. कारण तापसीसोबतच्या मैत्रीखातर वरुण विविध जाहिराती आणि नव्या प्रोजेक्ट्ससाठी तिचं नाव पुढे करत आहे. त्याचं हेच वागणं नताशाला अजिबात रुचलेलं नाही.

https://www.instagram.com/p/BUPWZSPA-0X/

https://www.instagram.com/p/BYqtxYMH40A/

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

पण, नताशाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण, वरुणच्या आयुष्यात तिचं फार महत्त्वाचं स्थान आहे. आता तर तो बऱ्याच कार्यक्रमांमध्ये तिच्यासोबत गेल्यावर माध्यमांपासून अजिबात चेहरा लपवत नाही. याशिवाय, नताशाबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनाही तो दिलखुलासपणे उत्तरं देतो. त्यामुळे नताशाचा हा क्षणिक रुसवाही लगेचच दूर होईल यात शंका नाही.