आज देशभरात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडत आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील एकूण ९३ जागांसाठी मतदान होत आहे. आज (७ मे) महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांमध्येही मतदान पार पडत आहे. आजच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते व उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते किरण माने यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे.

“हुकूमशाहीच्या बाजूने तुमचा सख्खा भाऊ जरी उभा असला तरी त्याला मत देऊ नका. हुकूमशाहीच्या विरोधात तुमचा कट्टर शत्रू जरी उभा असला तरी त्याला मत द्या. प्रश्न देशाचा आहे. प्रश्न तुमच्या-आमच्या जगण्याचा आहे. प्रश्न स्वातंत्र्याचा आहे. प्रश्न आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचा आहे. प्रश्न आपल्या आयाबहिणींच्या सुरक्षेचा आहे,” अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली आहे.

In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Loksatta editorial External Affairs Minister Jaishankar statement regarding the border dispute between India and China Eastern Ladakh border
अग्रलेख: विस्कळीत वास्तव!
aimim tiranga yatra marathi news
‘एमआयएम’ कडून मुस्लीम मतपेढीला साद
Prime Minister Narendra Modi clear opposition to war in his speech in the General Assembly
युद्धभूमी हे मानवतेचे यश नव्हे! आमसभेतील भाषणात पंतप्रधान मोदी यांचा पुन्हा युद्धाला स्पष्ट विरोध
Sharad Pawar criticism of the rulers over the economic power in the state print politics news
सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात अर्थसत्तेची मस्ती – पवार
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?

हेही वाचा – माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”

किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. यातच एका युजरने केलेल्या कमेंटला त्यांनी उत्तर दिलं आहे. एका युजरने ‘हुकूमशाही नाकारताना घराणेशाही स्वीकारली तर चालेल काय?’ अशी कमेंट किरण माने यांच्या पोस्टवर केली. त्यावर किरण मानेंनी उत्तर दिलं. “चालेल, ज्यांना आपण जाब विचारू शकतो, ते कुणीही चालेल. हुकूमशाहीविरोधात कुणीही चालेल, यात सगळे आले,” असं उत्तर किरण माने यांनी या युजरला दिलं.

kiran mane
युजरचा प्रश्न व किरण मानेंचं उत्तर

हेही वाचा – अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटात होत्या तब्बल १५ अभिनेत्री, ३० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावले होते…

किरण माने यांनी सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. “सर हिंदु नावाची अफूची गोळी खाऊ घातलेली आहे लोकांना…. त्यांची नशा अजुन पण उतरलेली नाही…. इतकी वाईट अवस्था झालेली आहे पण जे देशाला आणि संविधानाला वाचवण्यासाठी समोर आलेले आहेत त्यांनी बऱ्यापैकी नशेत असलेल्या अंधा भक्तांना शुद्धीत आणलय कुठे तरी देश आणि संविधान टिकेल अशी आशा आहे….”, अशा कमेंट्स किरण मानेंच्या पोस्टवर युजर्स करत आहेत.

कृष्णा अभिषेकवर ‘या’ कारणाने नाराज आहे मामा गोविंदा; म्हणाला, “तो मुलाखतीत वारंवार म्हणतोय की…”

किरण माने हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत, ते आपली रोखठोक मतं सोशल मीडियावरून मांडत असतात. आता निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते सातत्याने सोशल मीडिया पोस्ट करत आहेत. महाराष्ट्रात आजच्या मतदानानिमित्त त्यांनी केलेल्या या पोस्टची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. अनेक जण त्यांची ही पोस्ट शेअर करत आहेत.