‘हाफ गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असणारी श्रद्धा कपूर सध्याच्या घडीला तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ‘आशिकी २’ चित्रपटामुळे लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या श्रद्धांच्या चाहत्यांचा आकडा आता कोटींच्या घरात पोहोचला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर १५ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. इन्स्टाग्राम फॉलोअर्सचा हा आकडा तिची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असण्याचा पुरावाच म्हणावा लागेल. फॉलोअर्सचा हा आकडा पार केल्यानंतर तिच्या टिममधील सदस्यांनी खास सेलिब्रेशन करुन श्रद्धाला सरप्राइज दिले. चाहत्यांच्या प्रेमानंतर टिममधील सदस्यांनी दिलेल्या सरप्राइजने श्रद्धा भारावून गेली. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सचा आकडा १५ मिलियनपेक्षा अधिक झाल्यानंतर तिच्या टिममधील सदस्यांनी खास सेलिब्रेशन केले. टिममधील सदस्यांनी सेलिब्रेशनची केलेली तयारीबाबत श्रद्धाला कोणतीच कल्पना नव्हती. तिच्या टिममधील सदस्यांनी एका खोलीमध्ये केक ठेवला होता.  त्या केकवर १५ मिलियन फॉलोअर्स असे लिहिले होते.

सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकांउटवरुन शेअर केला आहे. हे सर्व माझ्यासाठी सरप्राइज असल्याचे सांगत श्रद्धाने सदस्यांसह चाहत्यांचे आभार मानले. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने मैत्रिणीच्या लग्नात धम्माल नृत्य केल्याचे पाहायला मिळाले होते. मैत्रिणीच्या लग्नातील नृत्याचा व्हिडिओ श्रद्धाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडिओप्रमाणेच श्रद्धाचा इन्स्टा फॉलोअर्स  सेलिब्रेशन व्हिडिओला देखील लोकप्रिय होताना दिसत आहे.

‘हाफ गर्लफ्रेंड’च्या चित्रीकरणानंतर श्रद्धा सध्या ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ या आगामी चित्रपटाच्या कामाला लागली आहे. चित्रपटात हसीना पारकरचा १७ ते ४० या वयातील जीवनप्रवास दाखविण्यात येणार असून या चित्रपटात श्रद्धा चार विविध लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. श्रद्धाचा ‘ओके जानू’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, सध्याची तिची वाढत्या लोकप्रियतेमुळे आगामी ‘हाफ गर्लफ्रेंड’चित्रपटात तिला कितपत यश मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल.