पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर आधारित अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. खिलाडी कुमारच्या या चित्रपटाने सर्वदूर प्रसिद्धी मिळवली आहे. उघड्यावर शौचास बसण्याची समस्या किती मोठी आहे आणि त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे या चित्रपटातून अधोरेखित करण्यात आलंय. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाविषयी चित्रपटातून जनजागृती होत असतानाच दुसरीकडे लोकांवर याचा काहीच परिणाम होत नाहीये असं दिसून येतंय.

झालं असं की, ट्विंकल खन्ना शुक्रवारी सवयीप्रमाणे मॉर्निंक वॉकसाठी निघाली. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरुन चालताना तिला किनाऱ्यावरच शौचास बसलेला एक व्यक्ती दिसला. तेथेच सेल्फी काढत ट्विंकलने तो फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं ‘टॉयलेट एक प्रेम कथा पार्ट २’ असं म्हटलंय. मुंबईसारख्या शहरातही अशी परिस्थिती पाहायला मिळणं दुर्दैवाचं म्हटलं जातंय. तर या फोटोखाली अनेक ट्विटर युझर्सनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असल्याचंही मत मांडलंय.

वाचा : सनीला उद्घाटनासाठी बोलावणं दुकान मालकाला पडलं महागात; पोलिसांकडून गुन्हा दाखल  

अक्षयच्या ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ चित्रपटातून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान श्री नारायण सिंग दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करतोय. आतापर्यंत चित्रपटाने शंभर कोटींहून अधिक कमाई केली आहे.