परळ येथील भोईवाडा गावाच्या पुनर्विकासासाठी नेमलेल्या विकासकाबरोबर केलेला करार रद्द करून नवा विकासकाची नियुक्ती करण्याची घाई पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला झाली आहे. यासाठी जुन्या विकासकाबरोबर पालिकेने केलेला करार रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेने घाईघाईने पालिका सभागृहात आणला होता. मात्र काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध करीत तो मागे घेणास प्रशासनास भाग पाडत शिवसेनेचा डाव हाणून पाडला.
भोईवाडा गावाच्या पुनर्विकासासाठी पालिकेने विघ्नहर्ता बिल्डर्स अॅण्ड प्रोजेक्टस् प्रा. लिमि. या कंपनीची नेमणूक केली होती. पालिकेने केलेल्या करारानुसार नियोजित वेळेत पुनर्विकास करण्यात विघ्नहर्ता बिल्डर अपयशी ठरले. परिणामी, येथील अनेक रहिवाशांना संक्रमण शिबिरात खितपत पडावे लागले आहे. याबाबत रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार केली होती. त्यामुळे या विकासकाबरोबर केलेला करार रद्द करण्याचा प्रस्ताव सुधार समितीपुढे सादर करण्यात आला होता. सुधार समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो स्थायी समितीपुढे सादर केला होता. स्थायी समितीने २० एप्रिल रोजी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर तात्काळ हा प्रस्ताव सभागृहाच्या मे महिन्याच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला. स्थायी समितीने ज्या दिवशी हा प्रस्ताव मंजूर केला, त्याच दिवशी तो बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी पाठविण्यात आला.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
mla dadarao keche bjp martahi news
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी