सीमा शुल्क विभागाने जप्त केलेल्या कंटेनरमधील बेकायदा चिनी फटाके नष्ट केले आहेत. जेएनपीटीसह येथील दोन खासगी बंदरातून आयात व निर्यात झालेल्या संशयित मालावर सीमा शुल्क विभागाने मागील पाच वर्षांत बंदरात केलेल्या कारवाई दरम्यान सात हजार कंटेनर ताब्यात घेतले होते. हे कंटेनर बंदरातील ओव्हरहेट विभागात पडून आहेत. या कंटेनर मध्ये देशात बंदी असलेल्या चिनी फटाक्यांचाही समावेश होता. ३८ कोटी रुपये किमतीच्या या फटाक्यांपैकी काही फटाके सीमा शुल्क विभागाने दिवाळीच्या मुहूर्तावरच नष्ट केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंदरातून तस्करीच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या संशयित सात हजार कंटेनरचा जप्त केलेला साठा आहे. यात २८२ कंटेनरमध्ये घातक स्फोटके आहेत. तर ५० कंटेनरमध्ये चीनमधून आयात करण्यात आलेल्या घातक व प्रतिबंधात्मक विभागात मोडणाऱ्या फटाक्यांचाही साठा आहे. यापैकी काही फटाके सीमा शुल्क विभागाने नष्ट केले आहेत. तसेच काही कंटेनरमध्ये महागडय़ा मर्सिडीज, रेंजरोवर आदी आलिशान गाडय़ाही आहेत.

कंटेनर निकासी एसएसएआय अ‍ॅनिमल्स वॉरंटी, प्लांट वारंटी, टाइम अ‍ॅथॉरिटी, ड्रग कंट्रोल या विभागां मार्फत देण्यात येणाऱ्या नाहरकत परवानग्या न मिळाल्याने हे कंटेनर येथे ठेवण्यात आलेले आहेत. यापैकी काही कंटेनर नष्ट करण्याचे आदेश देण्यात आलेले होते.