23 October 2017

News Flash

बर्थडे मोहित सुरीचा, कल्ला कलाकारांचा

 • दिग्दर्शक मोहित सुरीने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. मोहितचा वाढदिवस हा त्याच्यासह इतर कलाकारांसाठी जुन्या आठवणी नव्याने जगण्याचा एक दिवस ठरला. मोहितची पत्नी उदिता गोस्वामीने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला 'आशिकी २', 'एक व्हिलन' आणि त्याचा आगामी सिनेमा 'हाफ गर्लफ्रेंड'च्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या सिनेमांची खासियत म्हणजे या तीनही सिनेमात आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अर्जुन कपूरसोबत श्रद्धाच मुख्य अभिनेत्री होती. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

  दिग्दर्शक मोहित सुरीने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. मोहितचा वाढदिवस हा त्याच्यासह इतर कलाकारांसाठी जुन्या आठवणी नव्याने जगण्याचा एक दिवस ठरला. मोहितची पत्नी उदिता गोस्वामीने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला 'आशिकी २', 'एक व्हिलन' आणि त्याचा आगामी सिनेमा 'हाफ गर्लफ्रेंड'च्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या सिनेमांची खासियत म्हणजे या तीनही सिनेमात आदित्य रॉय कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अर्जुन कपूरसोबत श्रद्धाच मुख्य अभिनेत्री होती. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

 • श्रद्धाने मोहितला ट्विटरवर हाफ गर्लफ्रेंडचा एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'हॅपी बर्थडे मोमबडी!! तुझी हाफ गर्लफ्रेंड झाल्याचा मला अभिमान आहे,' असे कॅप्शनही तिने या फोटोला दिलेले.

  श्रद्धाने मोहितला ट्विटरवर हाफ गर्लफ्रेंडचा एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'हॅपी बर्थडे मोमबडी!! तुझी हाफ गर्लफ्रेंड झाल्याचा मला अभिमान आहे,' असे कॅप्शनही तिने या फोटोला दिलेले.

 • मोहित आणि त्याची पत्नी उदिता यांनी मुलांसोबत केक कापला. तसेच त्यांनी श्रद्धासोबत फोटोग्राफर्सना पोज दिली. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

  मोहित आणि त्याची पत्नी उदिता यांनी मुलांसोबत केक कापला. तसेच त्यांनी श्रद्धासोबत फोटोग्राफर्सना पोज दिली. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

 • 'आशिकी २'चा हिरो आदित्य रॉय कपूरनेही मोहितच्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

  'आशिकी २'चा हिरो आदित्य रॉय कपूरनेही मोहितच्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

 • मोहितने 'एक व्हिलन' सिनेमात सिद्धार्थची एक वेगळी बाजू मांडली होती. सिद्धार्थचे या सिनेमातील अभिनयासाठी कौतुक झाले होते. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

  मोहितने 'एक व्हिलन' सिनेमात सिद्धार्थची एक वेगळी बाजू मांडली होती. सिद्धार्थचे या सिनेमातील अभिनयासाठी कौतुक झाले होते. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

 • अर्जुन कपूर आणि चेतन भगत या दोघांनीही मोहितच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. चेतनच्या 'हाफ गर्लफ्रेंड' या पुस्तकावर आधारित 'हाफ गर्लफ्रेंड' हा सिनेमाही येत आहे. या सिनेमातून चेतन निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत आहे. 'नच बलिये ८' मधून मोहितने टीव्ही क्षेत्रातही पदार्पण केले. पुढच्या महिन्यात १९ तारखेला 'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

  अर्जुन कपूर आणि चेतन भगत या दोघांनीही मोहितच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. चेतनच्या 'हाफ गर्लफ्रेंड' या पुस्तकावर आधारित 'हाफ गर्लफ्रेंड' हा सिनेमाही येत आहे. या सिनेमातून चेतन निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत आहे. 'नच बलिये ८' मधून मोहितने टीव्ही क्षेत्रातही पदार्पण केले. पुढच्या महिन्यात १९ तारखेला 'हाफ गर्लफ्रेंड' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. (छाया सौजन्यः वरिंदर चावला आणि इन्स्टाग्राम)

अन्य फोटो गॅलरी