काही वर्षांच्या विश्रांनीनंतर परत जिज्ञासा हे सदर लिहायला घेत आहे. आधीच्या सदरात खगोलशास्त्राशी निगडित अनेक विषयांवर आपण चर्चा केली. जेव्हा गरज भासली तेव्हा प्रासंगिक विषयपण आपण हाताळले. या नवीन आवृत्तीत बातमीच्या पलीकडील खगोलशास्त्र या वर जास्त भर देण्याचा विचार आहे. आज आपण २०१३ मधे होणाऱ्या काही खगोलीय घटनांचा आढावा घेणार आहोत आणि मग या घटनांची चर्चा वेळो वेळी आपण करूच. सर्वप्रथम खगोलशास्त्राशी निगडित असलेली घटना म्हणजे मकरसंक्रांत. कदाचित हा विचार तुमच्या मनात येऊन गेला असेल की जर आपले सर्व सण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळ्या तारखांना येतात तर मकरसंक्रांतच का नेहमी १४ – १५ जानेवारीच्या सुमारास येते. काही वेळा आपण असेही ऐकतो की मकरसंक्रांतीनंतर आता हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागायला लागते. दिवस मोठा होऊ लागतो. पण दिवस हा २१-२२ डिसेंबरनंतरच मोठा होऊ लागतो, मग हे गौडबंगाल नेमक काय आहे. दरवर्षी होणाऱ्या खगोलीय घटनांमधील प्रामुख्याने चर्चिला जाणाऱ्या घटना म्हणजे ग्रहणे. २०१३ मध्ये दोन सूर्यग्रहणे होणार आहेत. १० मे आणि ३ नोव्हेंबर रोजी. ही दोन्ही ग्रहणे भारतातून दिसण  नाहीत. तर २५ एप्रिल, १३ मे आणि १८ ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहणे आहेत पण यातील एक ही चंद्रग्रहण खग्रास नव्हे. आणि फक्त २५ एप्रिलचे ग्रहण आपल्याला भारतातून दिसेल. एकूण ग्रहणांच्या बाबतीत हे वर्ष जरा रिकामेच असेल.
गेल्या काही वर्षांत नेहमी चर्चिली गेलेली खगोलीय घटना म्हणजे सावली विरहित दिवस. याचा साधारण संबंध आपल्या मकरसंक्रांतीशीपण आहे. या दिवशी काही सेकंद सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर येतो आणि त्या वेळी आपली सावली बरोबर आपल्या पाया खाली आलेली असते आणि आपण म्हणू शकतो की काही काळ आपली सावली गायब झाली. ही घटना सगळीकडे एकाच दिवशी होत नसते तर क्रमाक्रमाने वेगवेगळ्या रेखांशावर लोकांना वेगवेगळ्या दिवशी या अनुभवाचा आनंद घेता येतो. या सावली गायब होण्याचा कालावधी आपल्यासाठी मे महिन्याचे पहिले २ आठवडे. या खगोलीय घटनेची आपण सखोल चर्चा करू.
२०१२ मध्ये एक मोठी खगोलीय घटना झाली – शुक्राचे अधिक्रमण. पण पावसाळ्याचे दिवस होते. ढगाळ हवेमुळे मुंबईत ही घटना दिसली नाही. नेहरू तारांगणात मोठय़ा संख्येने लोक ही घटना बघायला आले होते. आणि त्यांची खूप निराशा झाली होती, की आयुष्यातील ही संधी गेली. तेव्हा एका आशेच्या सुरात मी म्हणालो होतो की कोण जाणे येत्या एक दोन वर्षांत तुम्हाला एखादा प्रखर धूमकेतूच बघायला मिळेल.  कदाचित ती संधी येत आहे २०१३ मध्ये. आयसॉन नावाच्या धूमकेतूला नुसत्या डोळ्यांनीच बघण्याची संधी आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. या धूमकेतूचा शोध २१ सप्टेंबर २०१२ रोजी कल्ल३ी१ल्लं३्रल्लं’ र्रूील्ल३्रऋ्रू डस्र्३्रूं’ ठी३६१‘ या दुर्बणिी ने लावला होता. आणि या दुर्बणिीच्या आद्याक्षरांपासून या धूमकेतूचे नामकरण आयसॉन असे करण्यात आले आहे. जेव्हा या धूमकेतूचा शोध लागला तेव्हा हा पृथ्वीपासून ९ कोटी किलोमीटर अंतरावर होता.
सध्या हा धूमकेतू शनी व गुरू यांच्या दरम्यान असून त्याचा प्रकाश इतका मंद आहे की त्याला छोटय़ा दुर्बणिीतून टिपता येण खूप अवघड आहे. याचा आकार सुमारे तीन किलोमीटर आखण्यात आला आहे आणि त्यामानाने मग याचा प्रकाश जरा जास्तच आहे. कारण तीन किलोमीटर आकारांच्या धूमकेतूंचा प्रकाश पृथ्वीपासून ९ कोटी किलोमीटर अंतरावर असताना यापेक्षा कमी असायला पाहिजे. याचाच अर्थ असाही होतो, की जेव्हा हा धूमकेतू २०१३ च्या शेवटच्या टप्प्यात सूर्याजवळून जाईल तेव्हा हा चांगला प्रखर दिसण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. तो आपल्याला सहज नुसत्या डोळ्यांना दिसेल. आणि तसे झाले तर या धूमकेतूची गणना इतिहातील प्रखर धूमकेतूंमध्ये होईल. इतकेच नव्हे तर ज्यांच्याकडे छोटय़ा दुर्बणिी आहेत त्यांना या धूमकेतूला बरेच आधी बघता येईल.  एकूण हौशी आकाश निरीक्षकांसाठी ही पर्वणीच असेल.