अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी स्पेलिंग बी ही स्पर्धा आता आणखी एका कारणाने चर्चत आली आहे. कारण पाच वर्षांच्या अमेरिकन मुलीने एका संस्कृत शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगून बाजी मारली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ही स्पर्धा भारतीय जिंकत आले आहेत, पण यावेळी मात्र संस्कृत शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगून या मुलीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

एडिथ फ्यूलर या पाच वर्षाच्या चिमुरडीने स्पेलिंग बी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे ज्या शब्दामुळे तिने ही स्पर्धा जिंकली, तो शब्द संस्कृत होता. अमेरिकेत होणारी नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा ही राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा आहे. विचारेल्या शब्दांचे स्पेलिंग अचूक सांगण्याची ही स्पर्धा असते. जिथे आजही आपल्यासारख्यांच्या स्पेलिंग लिहिताना चुका होतात तिथे या स्पर्धेत सहभागी होणारी मुलं कठीण शब्दांचे स्पेलिंगही अगदी अचूक सांगतात. त्यामुळे या स्पर्धेत किती हुशार मुलं येत असतील याची कल्पना तुम्ही केली असेच. या स्पर्धेत ‘ज्ञान’ या शब्दाचे स्पेलिंग अचूक सांगून ५ वर्षांच्या एडिथने या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. विशेष म्हणजे या अमेरिकन मुलीला हा संस्कृत शब्द असल्याचेही माहितीही नव्हतं.

जगभरातून अनेक मुलं दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होतात. दोन आठवड्यापूर्वी ओक्लाहोमा येथे या स्पर्धेची प्रादेशिक फेरी पार पडली. यात एडिथ स्पर्धा जिंकणारी सगळ्यात कमी वयाची विजेती ठरली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी २८ मेपासून होणार आहे. एडिथने ‘ज्ञान’ चे स्पेलिंग ‘Jnana’ असे सांगितले, इंग्रजीत हा शब्द असाच लिहितात. शब्द आणि त्याचा अर्थ माहिती नसतानाही तिने स्पेलिंग मात्र बरोबर सांगितली त्यामुळे परिक्षकही आश्चर्यचकित झाले.