नवी दिल्ली : खोटे आणि द्वेषाचे समर्थक असलेल्यांना नकार देऊन सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मतदान करा, असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी चित्रवाणी संदेशाद्वारे केले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे सदस्य लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

देशात युवकांमधील बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांमध्ये भेदभाव आदींनी अभूतपूर्व पातळी गाठली आहे. ही आव्हाने पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि भाजपच्या नियत (हेतू) आणि नीती (धोरण) आदींमुळे उद्भवल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला. सर्वसमावेशकता आणि संवाद नाकारून सत्ता स्थापन करणे, हेच त्यांचे लक्ष्य असल्याचा दावाही गांधी यांनी केला. काँग्रेसला साथ देऊन सर्वांसाठी शांतता आणि सौहार्द असलेला एक मजबूत, अधिक एकसंध भारत निर्माण करू या, असेही गांधी यांनी चित्रवाणी संदेशात म्हटले आहे.

readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी असू शकते…
Netizens burn Portrait of N Chandrababu Naidu For His Support For BJP Andhra Pradesh TDP faces strong dissent over choice of candidates in final list
भररस्त्यात जाळला एन. चंद्राबाबू नायडूंचा फोटो; भाजपाला पाठिंबा दिल्याने लोक संतप्त? पण, व्हायरल VIDEO मागचे सत्य काय?
mla s from shiv sena shinde faction complaints bjp and ncp leaders for not work in lok sabha elections
भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काम करण्यास टाळाटाळ ; शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांपुढे तक्रारींचा पाढा; फडणवीस, पवारांशी चर्चा करण्याचे आश्वासन
Manipur chief minister
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; एक सुरक्षा रक्षक जखमी
Narendra Modi promises to work with everyone for a developed India
राज्यघटना आमचा दीपस्तंभ! विकसित भारतासाठी सर्वाबरोबर काम करण्याचे मोदींचे आश्वासन
lok sabha election results 2024 bjp leaders hold meeting on eve of lok sabha poll counting
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप नेत्यांची बैठक
reasons given by Congress leaders for ignoring pm narendra modis statement about Gandhi
गांधीबाबत मोदींच्या विधानाकडे दुर्लक्ष, काँग्रेस नेत्यांनी दिली ही कारणे
Manmohan Singh
शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मनमोहन सिंग यांचे जनतेला उद्देशून पत्र; म्हणाले, “लोकशाही वाचवण्यासाठी…”

हेही वाचा >>> हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात; तीन अपक्षांकडून पाठिंबा मागे

एकसंध देशाचे उद्दिष्ट

‘देशाची राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहे. देशातील गोरगरीब जनता मागेच राहिली असून, समाजाची जडणघडण होत नाही. ही वस्तुस्थिती विदारक आहे. मी आज तुम्हाला पुन्हा एकदा पाठिंबा देण्याची विनंती करत आहे. देश एकत्र ठेवणे, गोरगरीब, तरुण, महिला, शेतकरी, कामगार आणि वंचित समुदायांसाठी काम करणे, हे आमच्या ‘न्याय पत्र’ आणि ‘गॅरंटी’चे उद्दिष्ट आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी देशाची लोकशाही आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.