येथील बोरावके महाविद्यालयात येत्या दि. २८ पासून दुसरी रयत विज्ञान परिषद आयोजित करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेदहा वाजता परिषदेचे उद्घाटन होणार असून या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. २ मार्च) परिषदेचा समोराप होणार आहे.
परिषदेचे कार्यवाहक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी ही माहिती दिली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचा दि. २ मार्चला समारोप होणार आहे. रयत शिक्षण संस्था, होमी भाभा विज्ञान केंद्र व टीआयएफआर (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या विज्ञान परिषदेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी हा संदेश रुजवला जाणार आहे. परिषदेचा उद्घाटन समारंभ रयतचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब िशदे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या वेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, औरंगाबाद येथील निर्लेप उद्योगसमूहाचे रामचंद्र भोगले, रयतचे उपकार्यवाहक डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. अरिवद बुरुंगले, सहसचिव प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
चिकित्साधिष्ठित अध्ययन, ज्ञानरचनावाद व ऊर्जा या विषयांवर आयोजित विज्ञान परिषदेत तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. व्याख्यात्यांमध्ये प्रा. डॉ. सत्यवती राऊळ, प्रा. वीणा देशमुख, प्राचार्य बी. टी. जाधव, डॉ. सुधीर कुंभार, डॉ. नरेंद्र देशमुख, विनोद सोनवणे, शास्त्रज्ञ डॉ. भारत काळे, डॉ. दिनेश अंमळनेरकर, डॉ. सागर देशपांडे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. विवेक सावंत, दूरदर्शनचे जयू भाटकर, आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनील देवधर, पत्रकार माधव गोखले यांचा समावेश आहे. रयतच्या विविध महाविद्यालयांची वैज्ञानिक प्रदर्शने, वैज्ञानिक खेळणी, कर्मवीर चित्रप्रदर्शन अशा विविध उपक्रमांनी परिषद संपन्न होणार आहे.
रयतचे सचिव प्राचार्य डॉ. अरिवद बुरुंगले यांच्या व्याख्यानाने रविवारी परिषदेचा समारोप होणार आहे. ता. २ मार्च रोजी होणार आहे. पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, औषधशास्त्रज्ञ डॉ. सचिन ईटकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Former Prime Minister Vajpayee village
भाजपा सरकार असतानाही माजी पंतप्रधान वाजपेयींचे गाव अनेक दशकांपासून महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत
AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Neha Hiremath and Accused Fayaz
काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची महाविद्यालयात हत्या; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचे कृत्य
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी