महेश सरलष्कर
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे अखेरचे चार टप्पे उरले असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केल्यामुळे भाजपविरोधातील विरोधकांचा प्रचार अधिक धारधार आणि तितकाच रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्ट्रीय स्तरावर मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्रात शरद पवार व उद्धव ठाकरे असे ‘इंडिया’तील प्रामुख्याने सहा नेते भाजप व मोदींना तगडे प्रत्युत्तर देत आहेत. त्यामध्ये अचूक वेळी मुरब्बी केजरीवालांची भर पडली आहे. दिल्लीमध्ये २५ मे रोजी मतदान होणार असून पुढील १३ दिवसांमध्ये भाजपविरोधात केजरीवालांच्या आक्रमकतेचा नवा अवतार पाहायला मिळू शकेल. केजरीवालांसाठी भाजप म्हणजे एखाद्या सावजासारखे असेल. केजरीवालांना मिळालेला जामीन ‘इंडिया’साठी वरदान ठरण्याची शक्यता मानली जात आहे.

water crisis in Delhi
दिल्लीत पाणीबाणी; भाजपाकडून ‘आप’विरोधात आंदोलन; जल बोर्डाच्या कार्यालयाची तोडफोड
Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलमध्ये अनिवासी भारतीय दाम्पत्याला मारहाण; काँग्रेस नेत्याने कंगणा रणौत यांच्यावर झालेल्या हल्लाशी जोडला संबंध; म्हणाले…
rahul gandhi on elon musk evm post
“ईव्हीएम हा एक ‘ब्लॅक बॉक्स’…”; एलॉन मस्क यांनी EVM वर शंका उपस्थित करताच राहुल गांधींची प्रतिक्रिया!
elon musk on eliminating EVM Rajeev Chandrasekhar reply
‘ईव्हीएम सुरक्षित नाहीत’, एलॉन मस्क यांचीही शंका; भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्याकडून शिका..”
Amit Shah claims that there is no campaign on the basis of religion
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले; अमित शाह यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, घडामोडींना वेग!
palestine pm letter to pm narendra modi
“मोदीजी आता तुम्हीच…”, इस्रायल-हमास युद्धादरम्यान पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचे पत्र
t raja singh statement news marathi
“४०० पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं”, भाजपा आमदाराचं विधान चर्चेत; भिवंडीतील धर्मसभेत केलं भाष्य!
mohan bhagwat
सरसंघचालक मोहन भागवतांची योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा; लोकसभा निकालांनंतर बैठक, अनेकांच्या भुवया उंचावल्या!
NCERT textbooks changed ayodhya dispute
NCERT च्या पुस्तकातून बाबरी मशीद हद्दपार; अयोध्या वादाचे ऐतिहासिक संदर्भही बदलले!

हेही वाचा >>>तुरुंगातून बाहेर येताच अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हुकूमशाही…”

केजरीवालांना ‘ईडी’ने अटक केल्यामुळे आम आदमी पक्ष कमालीचा हतबल झाला होता. काँग्रेससह ‘इंडिया’तील घटक पक्षांच्या मानसिक खच्चीकरणाचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात होता. अटकेपूर्वी केजरीवालांनी दिल्ली, गुजरातसह मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये लोकसभेच्या प्रचाराला वेग दिला होता. दिल्लीमध्ये काँग्रेस व ‘आप’ची आघाडी झाली असून इथेही केजरीवालांनी भाजपविरोधात टोकदार प्रचार सुरू केला होता. केजरीवालांच्या अटकेमुळे ‘आप’च्या प्रचाराची घोडदौड अचानक खंडित झाली. आता केजरीवाल जोशात दिल्लीमध्ये प्रचार करू शकतील. त्यामुळे दिल्लीत ‘आप’च्या ताकदीवर अवलंबून असलेल्या काँग्रेसलाही बळ मिळाले आहे.

केजरीवालांना अटक करून भाजपने राजकीय कुऱ्हाड पायावर मारून घेतल्याचे मानले जात होते. जामिनावर सुटलेले संजय सिंह, आतिशी, सौरभ भारद्वाज आदी आपच्या नेत्यांनी भाजपकडून होणाऱ्या ‘तोफगोळय़ा’नंतरही ‘आप’चा किल्ला कोसळू दिला नाही. ‘आप’ला खिंडार पाडण्याचे भाजपचे प्रयत्नही केजरीवालांच्या सहकाऱ्यांनी हाणून पाडले. शिवाय, केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल थेट मैदानात उतरून ‘आप’चे नेतृत्व करून लागल्याने भाजपला ‘आप’वर दबाव टाकण्यात फारसे यश आले नाही. त्या दिल्लीत प्रचारासाठी फिरत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.