बॉलीवूड अभिनेता आमिर खानने दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशालच्या लेकीचं नामकरण केलं आहे. हैदराबादमध्ये झालेल्या या सोहळ्यात आमिरने मुलीचं नाव मीरा ठेवलं. विष्णू विशालने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आमिरचे आभार मानले. मीरा म्हणजे प्रेम आणि शांती, असं विष्णूने सांगितलं. आमिर खान आणि विष्णू विशालची ओळख २०२३ मध्ये झाली होती. आमिरचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.