scorecardresearch

अनिल परब Photos

शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते आणि राज्याचे माजी परिवहनमंत्री अशी अॅड. अनिल दत्तात्रय परब (Anil Parab) यांची राजकीय ओळख आहे. ते ठाकरे कुटुंबीयांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. मागील २० वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना तीनदा विधानपरिषदेवर पाठवले आहे. शिवसेनेचे संकटमोचक म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असते. पालिका निवडणुकीच्या रणनीतीकारांपैकी ते एक आहेत.

२००१ मध्ये विभाग प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली होती. दोन विभागांची एकाच वेळी जबाबदारी असणारे ते एकमेव नेते आहेत. वांद्रे ते अंधेरीपर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्यावर विशेष जबाबदारी होती. याशिवाय नुकत्यात पार पडलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे परिवहन खात्याचे मंत्रीपद होते. सप्टेंबर २०२१ मध्ये अनिल परब राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लाचखोरी आणि मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी अनिल परब यांना करोडोंची लाच मिळाल्याचा आरोप केल्यानंतरही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं.
Read More
Rahul Narwekar Anil Parab
24 Photos
“४ महिने उलट तपासणी, ४ महिने साक्ष अन् आठवड्यातून दोनदाच…”, परबांनी सांगितला नार्वेकरांचा ‘तो’ डावपेच

अनिल परब यांनी नार्वेकर वेळकाढूपणासाठी डावपेच करत असल्याचा आरोप केला आणि तो डावपेच सांगितला. ते नेमकं काय म्हणाले याचा आढावा.

Kirit Somaiya Anil Parab
36 Photos
“किरीट सोमय्यांनी कुठंही म्हटलं नाही की, हा व्हिडीओ खोटा; याचा अर्थ…”, अनिल परबांचा हल्लाबोल

शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या प्रकरणावरून सडकून टीका केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

Seven Places ED has raided regarding Shivsena Anil Parab in Mumbai Pune and Ratnagiri
10 Photos
PHOTOS: ईडीने अनिल परबांशी संबंधित जागांवर छापेमारी केलेली ‘ती’ सात ठिकाणं कोणती?

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे

st workers protest
16 Photos
ST Workers Strike : कर्मचाऱ्यांसाठी श्रेणीनिहाय पगारवाढ, १० तारखेची हमी आणि प्रोत्साहन भत्ता..वाचा राज्य सरकारच्या मोठ्या घोषणा!

या पगारवाढीमुळे महिन्याला ३६० कोटींचा अतिरिक्त बोजा शासनावर पडेल. यासाठी ७५० कोटी सरकारला मोजावे लागणार आहेत.

ताज्या बातम्या