scorecardresearch

अनु मलिक Photos

अनु मलिक (Anu Malik) यांचे संपूर्ण नाव अन्वर सरदार मलिक असे आहे. २ नोव्हेंबर १९६० रोजी त्यांचा जन्म झाला. संगीतकार आणि सिनेदिग्दर्शक सरदार मलिक यांचे ते सुपुत्र आहेत. १९७७ मध्ये त्यांनी ‘हंटरवाली ७७’ या चित्रपटामध्ये सर्वप्रथम संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. या चित्रपटाद्वारे त्यांनी संगीतविश्वामध्ये पाऊल टाकले. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सोहणी महवाल’ या चित्रपटाला अनु यांनी संगीत दिले होते. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे नामांकन मिळाले होते. नव्वदच्या दशकामध्ये अनु मलिक हे नाव गाजलं. या काळात त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी सुपरहिट ठरली. ‘बाजीगर’, ‘जुडवा’, ‘मै खिलाडी तू अनाडी’, ‘बादशाह’, ‘रिफ्यूजी’, ‘इश्क’, ‘मर्डर’, ‘मैं हू ना’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी संगीत दिले आहे. त्यांना अनेक नामांकित पुरस्कार देखील मिळाले आहेत.

‘इंडियन आयडल’ (Indian Idol) या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्यांनी परिक्षक म्हणून काम केले आहे. या कार्यक्रमामधील एका महिला स्पर्धेकाने त्यांच्यावर बळजबरीने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा दावा केला होता. पुढे त्यांच्या विरोधातील मीटू प्रकरण वाढत गेलं. २०२० मध्ये पुराव्यांच्या अभावामुळे त्यांच्यावर खटले मागे घेण्यात आले.
Read More

ताज्या बातम्या