धाराशिव – मागील १३ दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढवित असलेल्या उमेदवार आणि पक्षनेत्यांकडून एकमेकांवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा आता थंडावल्या आहेत. निवडणूक लढवित असलेल्या ३१ उमेदवारांपैकी आपला खासदार निवडण्यासाठी मंगळवार, ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याची सर्व तयारी जिल्हा निवडणूक विभागाने केली आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० लाख चार हजार २८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १० लाख ५८ हजार १५६ पुरुष, नऊ लक्ष ४६ हजार ४८ स्त्री तर ७८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, धाराशिव, परंडा, लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी या सहा विधानसभा मतदारसंघात दोन हजार १३९ मतदान केंद्रे राहणार आहेत.

Sunetra Pawar
राष्ट्रवादीच्या वाट्याचे राज्यमंत्रीपद कुणाला मिळणार? सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली मंत्री होण्याची इच्छा
nana patole on mahashtra assembly election 2024
विधानसभेला काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार? नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसची २८८ जागांवर तयारी सुरू”!
Chhagan Bhujbal
“मला ते अपमानास्पद…”, छगन भुजबळांनी मांडली व्यथा; लोकसभेचं तिकीट न मिळण्याचं कारण सांगत म्हणाले…
chandrakant patil on maratha
“पराभवामागचं एक कारण म्हणजे मराठा…”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपाबद्दल असंतोष…!”
dhananjay munde pankaja munde beed news
बहिणीच्या पराभवावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “या सगळ्या पराभवाची जबाबदारी…”
maharashtra supplementary budget will be tabled in both houses of legislature on june 28
राज्याचा अर्थसंकल्प २८ जूनला
What Aditya Thackeray Said?
आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळलंय, मुख्यमंत्री..”
What Bhujbal Said About Sharad Pawar?
शरद पवारांचं बोट पुन्हा धरणार का? छगन भुजबळांचं उत्तर, “मी…”
What Bhujbal Said About Raj Thackeray ?
छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल, “बाळासाहेब आणि तुमचं रक्ताचं नातं, मग तुम्ही..”

हेही वाचा – पंतप्रधानांचे कार्यालय हे वसुली कार्यालय – प्रकाश आंबेडकर

लोकसभा मतदारसंघामध्ये ७१ मॉडेल मतदान केंद्र राहणार आहे. यामध्ये औसा विधानसभा क्षेत्रात १, उमरगा १७, तुळजापूर १७, धाराशिव १७, परंडा १७ आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात २ मतदान केंद्राचा समावेश आहे. संवेदनशील मतदान केंद्रामध्ये १ औसा, १ उमरगा, २ तुळजापूर, २ धाराशिव, १ परांडा व १ बार्शी अशा एकूण ८ मतदान केंद्राचा समावेश आहे. ज्या मतदान केंद्रावर सर्व मतदान अधिकारी-कर्मचारी या महिला असतील असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १ मतदान केंद्र हे महिला अधिकारी कर्मचारी हे मतदान प्रक्रियेचे काम पाहतील. तर ज्या मतदान केंद्रावर पूर्णत: युवा अधिकारी-कर्मचारी काम पाहतील त्यामध्ये सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे अशा एकूण ६ मतदान केंद्रांचा समावेश आहे. दिव्यांग अधिकारी कर्मचार्‍यांकडून १० मतदान केंद्र संचालीत केले जातील. यामध्ये औसा विधानसभा क्षेत्रात ५, उमरगा, तुळजापूर, धाराशिव, परंडा व बार्शी या विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी १ केंद्र दिव्यांग अधिकारी-कर्मचार्‍यांकडून चालवले जातील.

लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा क्षेत्रात ३०७, उमरगा ३१५, तुळजापूर ४०६, धाराशिव ४१०, परंडा ३७२ आणि बार्शी ३२९ असे एकूण २१३९ मतदान केंद्र राहणार आहे. औसा विधानसभा क्षेत्रात १४७३, उमरगा विधानसभा क्षेत्रात १५१२, तुळजापूर विधानसभा क्षेत्रात १९४८, धाराशिव विधानसभा क्षेत्रात १९६८, परंडा विधानसभा क्षेत्रात १७८५ आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात १५८० असे एकूण १० हजार २६६ मतदान निवडणूक अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे काम पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा – “कितीही प्रयत्न केला तरी शरद पवारांची जागा कुणीही घेऊ शकत नाही”, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला!

मतदारांना व्होटर स्लिपचे वाटप

मतदारांना मतदान करताना अडचण येऊ नये, त्यांना मतदान केंद्र, मतदार यादीतील अनुक्रमांक, भाग क्रमांक सहज उपलब्ध व्हावा यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत बार कोड असलेल्या मतदान पत्रिका (व्होटर स्लिप) घरोघरी वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांना बारकोड स्कॅन केल्यावर त्यांचे मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती होण्यास मदत होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांची मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण केली आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.