scorecardresearch

अनुप जलोटा News

भजनसम्राट अशी ओळख असलेले अनुप जलोटा गेली अनेकवर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. अनुप जलोटा यांचा जन्म नैनिताल, उत्तराखंड येथे झाला. गाणी, गझल, चित्रपट गीते गाऊन त्यांनी गायन क्षेत्रात एक वेगळे स्थान मिळवले आहे. अनुप जलोटा यांचे गुरू आणि वडील पुरुषोत्तम दास जलोटा हे सुप्रसिद्ध भजन गायक होते. त्यांना अनिल जलोटा आणि अजय जलोटा असे दोन लहान भाऊ आणि अंजली धीर आणि अनिता मेहरा या दोन बहिणी आहेत. अनुप जलोटा यांनी सहा भाषांमध्ये भजन आणि गझलांचे दीडशेहून अधिक अल्बम प्रकाशित केले आहेत. ऐसी लागी लगन, मैं नही मखन खायो, रंग दे चुनरिया, जग मे सुंदर है दो नाम, आणि चदरिया झिनी रे झिनी ही त्यांची प्रसिद्ध भजने आहेत. बिग बॉस सीझन १२ मध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.Read More