Babar Azam Angry on Fans Video Viral: पाकिस्तान क्रिकेट संघ आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ कार्डिफला पोहोचला आहे. कार्डिफ येथील बाबर आझमचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, जिथे तो भर रस्त्यात त्याला भेटण्यासाठी फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर संताप व्यक्त करत आहे.

बाबर आझमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बाबर रस्त्यावर काही चाहत्यांना ओरडताना दिसत आहे. दोन मिनिट द्याल? डोक्यावर नका बसू… असं म्हणत त्याने चाहत्यांना मागे केलं आणि त्यानंतर तो एका व्यक्तीशी चर्चा करताना दिसला. पण तरीही चाहते ऐकेनात शेवटी त्याने सिक्युरिटीला सर्वांना मागे करण्यासा सांगितले, बाबरच्या या वागण्यावरून त्याच्यावर बरीच टीका होत असून त्याच्या डोक्यात स्टारडम गेल्याचे बोलले जात आहे. खरंतर बाबर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी कार्डिफला पोहोचला होता. बाबर येथील एके ठिकाणी थांबला होता, तेव्हा चाहत्यांनी त्याला ओळखले. काही वेळातच चाहत्यांची गर्दी तिथे जमली.

Hardik Natasa not staying together said their friend
हार्दिक-नताशाच्या मित्राचे घटस्फोट प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाला, दोघेही अनेक महिन्यांपासून….
bring rohit sharma hardik pandya together
रोहित – हार्दिकला एकत्र आणणे महत्त्वाचे ; ट्वेन्टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हरभजन सिंगचे मत
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा – IPL 2024: ५५ लाख रुपयांच्या मानधनावरुन रिंकू सिंग म्हणाला

लोकांचा जमाव पाहून पाकिस्तानी कर्णधार संतापला आणि त्याने चाहत्यांशी गैरवर्तन केले. यादरम्यान त्याच्या अंगरक्षकाने चाहत्यांना धक्काबुक्की करून मागे ढकलले. बाबर आझमच्या या कृतीवर चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. मात्र, काही चाहत्यांनी बाबर आझमचा बचावही केला आहे. क्रिकेटर असण्यासोबतच बाबरचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य देखील आहे. हेही चाहत्यांनी लक्षात ठेवावे, असे सोशल मीडियावर काही चाहत्यांचे म्हणणे आहे. पण पुढे व्हीडिओमध्ये बाबरचे बोलून झाल्यानंतर त्याने चाहत्यांसोबत फोटोही काढल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, भाऊ कृणालच्या पोस्टवरील पंड्याच्या बायकोची कमेंट व्हायरल

पाकिस्तान क्रिकेट संघ चार टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तानी संघाची ही शेवटची मालिका आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी संघाला इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे हा तिसरा सामना मालिकेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. या मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना ३० मे रोजी केनिंग्टन ओवल येथे खेळवला जाईल. बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघ इंग्लंडला पराभूत करत टी-२० विश्वचषकासाठी उतरावा, हे संघाचे लक्ष्य असेल.