कोलकाता नाइट रायडर्स Videos

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. हा संघ पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहराचे प्रातिनिधित्व करतो. तेथील ईडन गार्डन्स हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. शाहरुख खान, जूही चावला आणि जय मेहता (जूही चावलाचा पती) यांच्या या संघाची मालकी आहे. सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये सौरव गांगुली यांनी केकेआरचे नेतृत्त्व केले. २००८ ते २०१० या दोन वर्षांच्या कालावधीत संघाने समाधानकारक कामगिरी केली. पुढे २०११ मध्ये संघाचे कर्णधारपद गौतम गंभीरकडे देण्यात आले. तेव्हा हा संघ प्लेऑफ्सपर्यंत पोहोचला होता. पुढच्या वर्षी म्हणजेच २०१२ मध्ये केकेआरच्या संघाने पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली.


२०१२ नंतर २०१४ मध्ये या संघाने आयपीएलचे विजेतेपद राखले. २०१४ पासून ते आत्तापर्यंत या संघाने चांगला खेळ करुन दाखवला आहे. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. २०२२ च्या हंगामामध्ये श्रेयस अय्यर हा केकेआरचा (KKR) कर्णधार होता. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार की नाही याबाबत चाहते साशंक आहेत. असे झाल्यास संघाची धुरा कोणाकडे देण्यात येईल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.


Read More

ताज्या बातम्या