Ravichandran Ashwin and Kuldeep Yadav Video : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धरमशाला येथे खेळल जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांत गारद झाला. भारतीय संघाकडून कुलदीप यादव सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर १००वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने चार आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. अशा प्रकारे भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडच्या डावाला सुरुंग लावला. यानंतर बीसीसीआयने कुलदीप आणि अश्विनचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

इंग्लंडचा डाव गुंडाळल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू एकमेकांचे कौतुक करत पॅव्हेलियनमध्ये जात असताना, कुलदीप आणि अश्विनने एकमेकांप्रती दाखवलेल्या औदार्याने सगळेच प्रभावित झाले. वास्तविक, १०० वा कसोटी सामना खेळण्याची कामगिरी प्रत्येक खेळाडूसाठी खास असते. अशा परिस्थितीत अश्विनसाठीही हा क्षण खास होता. अश्विनने १०० व्या कसोटीच्या पहिल्या डावात ५ विकेट्स घेण्यापासून एक विकेट दूर राहिला. मात्र, त्याचा युवा साथीदार कुलदीप यादवने पाच विकेट्स घेतल्या.

Mohit Sharma Unwanted Record
DC vs GT : ऋषभने धुलाई करताच, मोहित शर्मा ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराहला षटकार मारल्यावर आशुतोष शर्माचा आनंद गगनात मावेना! सामन्यानंतर म्हणाला….
IPL 2024 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: अंगक्रिश रघुवंशीच्या पहिल्या अर्धशतकाचे खास सेलिब्रेशन कोणासाठी केले? सामन्यानंतर सांगितले
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई

एका डावात ५ विकेट घेतल्यानंतर, गोलंदाज संस्मरणीय कामगिरी म्हणून चेंडू त्याच्याकडे ठेवतो. पण इथे कुलदीपच्या ५ विकेट्सपेक्षा अश्विनच्या १००वा कसोटी महत्त्वाचा होता, त्यामुळे अशा स्थितीत कुलदीप यादवने पहिल्या डावात वापरलेला चेंडू रविचंद्रन अश्विनच्या दिशेने टाकला आणि त्याच्याकडे सोपवला. पण अश्विनने त्याच शैलीत त्याला चेंडू परतवला. पुन्हा एकदा कुलदीप यादवने चेंडू अश्विनच्या दिशेने टाकला आणि त्याला स्वतःकडे ठेवण्यास सांगितले.

हेही वाचा – IND vs ENG 5th Test : …आणि रोहित शर्माच्या चुकीवर सर्फराझ खान हसला! VIDEO होतोय व्हायरल

यावेळी मोहम्मद सिराजही दोघांमध्ये आला आणि त्यालाही हा चेंडू पकडून अश्विनला द्यायचा होता, पण अश्विनने आपला ज्युनियर आणि प्रतिभावान खेळाडू कुलदीप यादवला हा चेंडू आपल्याकडे ठेवण्यास सांगितले. कारण त्याने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे चेंडूवर त्याचा पहिला हक्क होता. यावेळीही कुलदीप यादव अश्विनला नकार देऊ शकला नाही आणि चेंडू पकडल्यानंतर त्याने तो डाव्या हातात घेतला आणि स्टेडियममध्ये आलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने फिरवला आणि त्यांचे अभिवादन स्वीकारले. अश्विन आणि कुलदीपचा हा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे, जो चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.