17 January 2021

News Flash

डिसेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीत २४ टक्के वाढ

डिसेंबर २०१९ मध्ये देशातील प्रवासी वाहनांची विक्री संख्या २,१८,७७५ होती.

| January 13, 2021 02:16 am

वित्त वर्षांतील सर्वोत्तम मासिक प्रवास

नवी दिल्ली : वर्ष २०२० च्या शेवटच्या महिन्यात देशातील प्रवासी वाहन विक्रीत २३.९९ टक्के वाढ झाली असून डिसेंबरमध्ये एकूण २,७१,२४९ वाहनांची विक्री झाली आहे. वित्त वर्ष २०२०-२१ मधील सर्वोत्तम मासिक वाढ गेल्या महिन्यात नोंदविल्याचा दावा करण्यात आला आहे.

वाहन वितरकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘फाडा’ने (फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन) सोमवारी जाहीर केल्यानुसार डिसेंबर २०२० मध्ये देशातील प्रवासी वाहन विक्रीत वार्षिक तुलनेत जवळपास २४ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

संघटनेने देशातील १,४७७ पैकी १,२७० विभागीय वाहतूक कार्यालयातून घेतलेल्या नोंदीच्या आधारे ही माहिती जाहीर केली आहे. वर्षभरापूर्वी, डिसेंबर २०१९ मध्ये देशातील प्रवासी वाहनांची विक्री संख्या २,१८,७७५ होती.

गेल्या महिन्यात १४,२४,६२० दुचाकी विकल्या गेल्या असून वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील १२,७३,३१८ दुचाकींच्या तुलनेत वाढीचे प्रमाण ११.८८ टक्के आहे.

डिसेंबर २०२० मध्ये २७,७१५ तीनचाकी वाहनांची विक्री झाली असून त्यात डिसेंबर २०१९ मधील ५८,६५१ वाहनांच्या तुलनेत तब्बल ५२.७५ टक्के घसरण नोंदली गेली आहे.

व्यापारी वापरासाठीच्या वाहनांची विक्री वर्षभरापूर्वीच्या ५९,४९७ वरून यंदा १३.५२ टक्क्यांनी रोडावून ५१,४५४ झाली आहे.

ट्रॅक्टरची विक्री ५१,००४ वरून ६९,१०५ पर्यंत (+३५.४९%) गेली आहे.

डिसेंबर २०२० मध्ये सर्व गटातील मिळून एकूण वाहन विक्री १८,४४,१४३ झाली आहे.

डिसेंबर २०१९ मधील १६,६१,२४५ वाहनांच्या तुलनेतील त्यातील वाढ ११.०१ टक्के आहे.

वर्ष २०२० अखेरच्या महिन्यात वाहन निर्मात्या कंपन्यांसह वाहन विक्रेता दालनांनीही विक्रीवर घसघशीत सूट देऊ केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 2:16 am

Web Title: passenger vehicle sales up 24 percent in december zws 70
Next Stories
1 ‘नफेखोर कंपूबाजी’चे आरोप-प्रत्यारोप
2 सेन्सेक्स ४९ हजार पार
3 सप्टेंबरपर्यंत बुडीत कर्जे दुपटीने वाढणार!
Just Now!
X