अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँकेने ग्राहकांना शहरातील शिवाजीनगर शाखेत इ-लॉबी सुविधा उपलब्ध करून दिली असून नुकतेच बँकेचे अध्यक्ष विलास देसाई यांच्या हस्ते त्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या इ-लॉबीमुळे ग्राहकांना पैसे काढण्याबरोबरच अहोरात्र  खात्यात धनादेश जमा करता येतील आणि पासबुक भरून घेता येईल. २०१३-१४ या आर्थिक वर्षांत बँकेस १०० ते ३५० कोटी ठेवी या गटातील सवरेत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार मिळाला. पहिला पुरस्कार सांगली येथील बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेस मिळाला.  महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बॅक्स फेडरेशनच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. बँकेची सांपत्तीक स्थिती, नफा खेळते भांडवल, ऑडिट वर्ग, व्यवसाय वृद्धीचा आलेख आदी बाबी पुरस्कार देताना विचारात घेतल्या जातात. सध्या बँकेचा एकूण व्यवसाय ४४७ कोटींचा असून त्यापैकी २८७ कोटी रूपयांच्या ठेवी तर १६० कोटी रूपयाचे कर्ज वितरीत करण्यात आले. तसेच  बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधार सामंत यांनी दिली. २७ वर्षे पूर्ण झालेल्या बँकेच्या वांगणी ते ठाणे दरम्यान बारा शाखा कार्यरत आहेत.