गेल्या आठवड्यात झालेल्या पडझडीतून सावरत मुंबई शेअर बाजाराने सोमवारी दिवसभरात तब्बल ५०० अंकांची उसळी घेतली. सायंकाळी व्यवहार थांबले तेव्हा शेअर बाजाराने २७ हजार ६२७ अंकांचा गेल्या ११ महिन्यांतील उच्चांक गाठला होता.
ऑक्टोबर २०१५ मध्ये सेन्सेक्सने एकाच दिवसात ४५० अंकांची उसळी घेत २७ हजार ५०० अंकांचा आकडा गाठला होता. हा विक्रम मोडीत काढत आज बाजाराने ५०० अकांची उसळी घेतली. आज सकाळी बाजार उघडल्यानंतर सकाळी दहा वाजता बाजार ४७३ अंकांनी वधारला होता. दरम्यान, निफ्टीच्या निर्देशंकानेही चांगली प्रगती नोंदवत १४६ अंकांची वाढ झालेली पाहायला मिळाली. निफ्टीचा बाजार आज ८ हजार ४६७ अंकांवर थांबला.