13 August 2020

News Flash

माझा पोर्टफोलियो : उत्पादन भांडार दमदार, वजनदार

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीचे जागतिक आघाडीवर तीन मुख्य व्यवसाय असून त्यांत संशोधन, फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर यांचा समावेश होतो

संग्रहित छायाचित्र

अजय वाळिंबे

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (जीएसके) फार्मास्युटिकल्स लिमिटेड म्हणजेच १९४२ मध्ये स्थापना झालेली भारतातील सर्वात जुनी ग्लॅक्सो फार्मास्युटिकल्स ही बहुराष्ट्रीय कंपनी. सन २००० मध्ये ग्लॅक्सो वेलकम आणि स्मिथक्लाइन बीचम या दोन मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे विलीनीकरण होऊन स्थापन झालेली कंपनी म्हणजे सध्याची ब्रिटिश कंपनी ग्लॅक्सोस्मिथक्लाइन पीएलसी.

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीचे जागतिक आघाडीवर तीन मुख्य व्यवसाय असून त्यांत संशोधन, फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर यांचा समावेश होतो. गेल्याच वर्षी ग्लॅक्सोस्मिथक्लाइन पीएलसीने ‘टेसारो इन्क’ ही ऑन्कोलॉजी व्यवसायातील कंपनी ताब्यात घेतल्यामुळे आता तिला कर्करोगावरील औषधे निर्मितीला आणि संशोधनाला वाव मिळेल. भारतातील जीएसके फार्मास्युटिकल्स ही ग्लॅक्सोस्मिथक्लाइन पीएलसीची उपकंपनी असून ती मुख्यत्वे लसीकरण, औषधे आणि कन्झ्युमर हेल्थकेअरमध्ये आहे. कंपनीचा उत्पादन प्रकल्प नाशिकमध्ये असून क्लिनिकल डेव्हलपमेंट सेंटर बंगळूरु येथे आहे.

कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये अनेकविध औषधे, ओरल केअर तसेच हेल्थ केअर उत्पादनांचा समावेश असून त्यात इनो, हॉर्लिक्ससारख्या ओटीसी उत्पादनांचा देखील समावेश होतो. प्रिस्क्रिप्शनची औषधे अ‍ॅण्टी-इन्फेक्टीव्हज, त्वचाविज्ञान, स्त्रीरोग, मधुमेह, ऑन्कोलॉजी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि श्वसन रोग यांसारख्या उपचारात्मक क्षेत्रांमध्ये आहेत. कंपनी बऱ्याच उपचारात्मक विभागात – त्वचाविज्ञान, अ‍ॅण्टी-हेलमेंटिक्स आणि हार्मोन्समध्ये अग्रस्थानी असून पहिल्या ५० ब्रॅण्डमध्ये कंपनीची सात उत्पादने आहेत. जीएसकेच्या प्रमुख उत्पादनांत ऑग्मेंटिन, कॅल्पोल, सेफ्टम, फेक्सिन आणि बेनेसोल यांचा समावेश होतो. वेगाने वाढणाऱ्या लसींच्या बाजारपेठेत कंपनीचा लस विभाग प्रथम क्रमांकावर आहे. भारतातील काही आघाडीची उत्पादने हॅव्हिक्स, व्हॅरिलिक्स, रोटारिक्स, हायबेरिक्स आणि सव्‍‌र्हेरिक्स आहेत. या शिवाय हिपॅटायटीस ए, हिपॅटायटीस बी, एच, इन्फ्लूएन्झा, चिकनपॉक्स, डिप्थीरिया, पेटर्य़ूसिस, टिटॅनस इत्यादींमुळे होणाऱ्या आक्रमक आजारापासून बचाव करण्यासाठी लस प्रदान करते. या व्यवसायात कंपनीचा भारतीय बाजारपेठेत ३० टक्के हिस्सा आहे.

मार्च २०२० अखेर समाप्त आर्थिक वर्षांसाठी कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली नाही. कंपनीने ३२२४.३८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ९३.२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ७९.०७ टक्क्यांनी कमी आहे. परंतु आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. न्यूकाला हे नवीन औषध भारतातील तीन कोटी दमेकरी रुग्णांसाठी वरदान ठरू शकेल. तसेच कर्नाटकमधील वेंगल येथे कंपनीचा १००० कोटी रुपयांचा गुंतवणूक केलेला अत्याधुनिक प्रकल्प कार्यान्वित झाला असून त्याचा मोठा फायदा कंपनीला होईल. सध्याचे प्राइस अर्निग गुणोत्तर पाहता हा शेअर महाग वाटत असला तरीही दीर्घकालीन दृष्टी ठेवल्यास अत्यल्प बीटा असलेल्या जीएसकेमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकेल.

जीएसके फार्मास्युटिकल्स लि.

(बीएसई कोड – ५००६६०)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,४८१.१०

लार्ज कॅप

प्रवर्तक : ग्लॅक्सोस्मिथक्लाइन पीएलसी, यूके

उद्योग क्षेत्र : औषधी, लस, आरोग्यनिगा

बाजार भांडवल : रु. २५,०९० कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक :                          रु.  १,७४८/ ९६३

भागभांडवल भरणा : रु. १६९.४१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ७५.००

परदेशी गुंतवणूकदार  ०.३०

बँक/ म्यु. फंड/ सरकार   ११.३७

इतर/जनता  १३.३३

पुस्तकी मूल्य : रु. १०७.४७

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश :   ४००%

प्रति समभाग उत्पन्न : रु. ५.५

पी/ई गुणोत्तर : २२७

समग्र पी/ई गुणोत्तर :   ७०

डेट इक्विटी गुणोत्तर :   ०.०२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १०३.०९

रिटर्न ऑन कॅपिटल : ३१.११

बीटा : ०.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 12:04 am

Web Title: article on glaxosmithkline plc portfolio abn 97
Next Stories
1 सापळा तेजीचा
2 बंदा रुपया : ताणा-बाणा धाग्यांची गुंफण
3 माझा पोर्टफोलियो : विषाणू बाधारहित नवपिढीचा व्यवसाय
Just Now!
X