‘पोर्टफोलिओ’साठी या वर्षांत शक्यतो लार्ज कॅप शेअर्स खरेदी करण्याचे धोरण ठेवले होते. मात्र पोर्टफोलिओचा परतावा वाढण्यासाठी काही मिड कॅप आणि स्मॉल कॅप, मायक्रो स्मॉल कॅप शेअर्सदेखील खरीदणे आवश्यक ठरते. तसेच कधी कधी काही ‘हटके शेअर्स’ मध्येच लक्षात आल्यावर त्याचाही विचार होणे आवश्यक असते.

विकास इकोटेक म्हणजे पूर्वाश्रमीची विकास ग्लोबल वन लिमिटेड. १९८४ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी मुख्यत्वे पॉलिमर कंपाउंड तसेच स्पेशालिटी केमिकल्सचे आणि अ‍ॅडिटिव्ह्जचे उत्पादन करते. कंपनीची उत्पादने अनेक उद्योगांत तसेच प्रक्रियेत वापरली जातात. यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यावरील प्रक्रिया, प्लास्टिक, पॉलिमर, रबर, पादत्राणे, वस्त्रोद्योग, इलेक्ट्रिकल, एफएमसीजी, फार्मा तसेच पॅकेजिंग यांचा समावेश करावा लागेल. सध्या कंपनीची जम्मू-काश्मीर तसेच राजस्थान येथे उत्पादन केंद्रे असून कंपनी लवकरच गुजरातमधून उत्पादन सुरू करेल. आपल्या उत्पादनांना असणाऱ्या विविध ग्राहकांची मागणी पुरविण्यासाठी कंपनी विस्तारीकरणाच्या योजना आखत असून आगामी कालावधीत इतर राज्यांतदेखील कंपनीचा उत्पादन सुरू करण्याचा विचार आहे. फ्रान्स आणि अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर अल्पावधीतच कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपले स्थान पक्के केले आहे. जगभरातील सुमारे २० देशांत विकास इकोटेक आपली उत्पादने निर्यात करते तसेच त्यांचे वितरण करते. आपल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता कंपनी लवकरच पश्चिम तसेच दक्षिण भारतात उत्पादन सुरू करीत असून निर्यातीसाठी दहेज येथे निर्यात सुविधा उभारत आहे. सध्या केमिकल क्षेत्राला उत्तम दिवस असून विकास इकोटेकसारख्या कंपन्यांच्या उत्पादनांना वाढती मागणी राहणार हे निश्चित.

Job opportunity in CBI apply immediately
सीबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी, त्वरित अर्ज करा…
WhatsApp without internet allowed to send photos and files on Other Users Similar to apps like ShareIt
विना इंटरनेट करा फोटो,व्हिडीओ शेअर; ‘या’ ॲपमध्ये मिळणार सोय
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

म्हणूनच गेल्या तिमाहीत ११५.१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८.६७ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावणाऱ्या विकास इकोटेकचे भवितव्य उज्ज्वल वाटते. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर चांगला परतावा देऊ  शकेल.

 

विकास इकोटेक लिमिटेड

(बीएसई कोड – ५३०९६१)

मायक्रो स्मॉल कॅप समभाग

प्रवर्तक : विकास गर्ग

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                                                      ३९.५३ 

परदेशी गुंतवणूकदार                                  ०.९५

बँक/ म्यु. फंड / सरकार                             ०.४५

इतर                                                           ५९.०७

 

बाजारभाव (रु.)                                          १९.०५

उत्पादन/ व्यवसाय                                    रसायने

भरणा झालेले भागभांडवल (रु.)                 ३०.५६ कोटी

पुस्तकी मूल्य (रु.)                                     ४.४०

दर्शनी मूल्य (रु.)                                        १/-

लाभांश (%)                                                ५%

प्रति समभाग उत्पन्न (रु.)                         १.०६

पी/ई गुणोत्तर                                            १९.९

समग्र पी/ई गुणोत्तर                                  ३३.१

डेट/इक्विटी गुणोत्तर                                ०.०९

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर                          ४.९९

रिटर्न ऑन नेटवर्थ (%)                             ३३.२१

बीटा                                                         १.३

बाजार भांडवल (कोटी रु.)                         ६३४.०४

५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.)   २५/१५

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.