या वर्गात मोडणाऱ्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाच्या शब्दकोशात बचत व गुंतवणूक या गोष्टी फक्त नावापुरत्या असतात. यांचे आर्थिक समीकरण कमाई-खर्च=कर्ज असे असते.

खर्च करताना हे लोक गरज (need) आणि मागणी (demand) यामध्ये नेहमी मागणीलाच हे लोक गरज समजतात. त्यामुळे आर्थिक निर्णयांच्या बाबतीत यांची खर्च करणे ही प्राथमिकता असते. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल यांनी जो मार्शमेलो प्रयोग (Marshmallow Experiment) सांगितला त्यानुसार त्यांच्यासमोर दोन पर्याय त्वरित आनंद मिळवायचा (Immediate Gratification) किंवा संयम ठेऊन ताबडतोबीचा आनंद टाळून अधिक चांगले सुख मिळवण्यासाठी वाट पाहायची (Delayed gratification). यापैकी त्यांना वर्तमानकाळातील मोह नियंत्रित करता येत नाही व त्वरित आनंद मिळवण्यासाठी हे लोक खर्च करतात.

Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
people having these mulank or birthdate are honest with partner
Numerology: नातेसंबंधात प्रामाणिक असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, प्रत्येक सुख दु:खात देतात जोडीदाराला साथ
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

या प्रकारच्या आर्थिक व्यक्तिमत्त्वात मोडणाऱ्यांची स्वभाव वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे :

  • आवश्यक रोख रक्कम जतन करण्यापेक्षा मोठी खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊन पैसे देतात.
  • नेहमी क्रेडिट कार्ड, कर्ज किंवा वस्तू गहाण ठेऊन पैसे खर्च करतात.
  • खर्च हा कमाईपेक्षा नेहमी जास्त असतो.
  • साधारणपणे त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त व महागडय़ा राहणीमानात आनंद मानतात.
  • यांना पैसा हा खर्च करण्यासाठी कमवला पाहिजे असे वाटते.
  • हे लोक नेहमी कर्जबाजारी असतात. यांचे कर्ज अनावश्यक गोष्टींसाठीचे असते.
  • हे लोक खर्च करणे कसे बरोबर आहे याचे समर्थन करत राहतात.
  • आज जगा, मजा करा, उद्या कोणी बघितलंय आणि म्हणून बिनधास्त खर्च करा अशी त्यांची सवय असते.
  • त्यांना त्यांच्या खर्चीक सवयीविषयी कोणी बोलले तर हे लोक चिडतात.
  • यांना खर्चीक वृत्ती म्हणजे धाडसीपण असे वाटत राहते.
  • हे लोक वस्तूंच्या किमती ठरवताना जास्त घासाघीस करत नाहीत.
  • महाग वस्तू म्हणजे चांगली असा यांचा समज असतो.
  • कोणत्याही व्यक्तींबरोबर हे लोक खरेदी करण्यासाठी गेले असतील तर गरज नसताना हे लोक खरेदी करून येतात.
  • बऱ्याच वस्तू खरेदी करून वापरलेल्या नसताना त्याच पुन्हा खरेदी करून आणतात.

या प्रकारच्या आर्थिक व्यक्तिमत्त्वाच्या लोकांना येणाऱ्या अडचणी :

  • हे लोक कधीच पैसे साठवत नाहीत, त्यामुळे आणीबाणीच्या वेळी यांच्याकडे पैसे नसतात.
  • क्रेडिट कार्ड नेहमी वापरल्याने ते नेहमी व्याज व दंड भरत असतात.
  • एक कर्ज संपले की नवीन कर्ज काढत असतात, त्यामुळे नेहमी कर्जबाजारी असतात.
  • त्यांच्या सवयीची शिक्षा घरच्यांना मिळते.

– सतत दिखाऊ आयुष्य जगल्याने खोल मनात बऱ्याचदा अपराधीभाव असतो.

  • यांच्या आयुष्यात मालमत्ता (assets) यापेक्षा आर्थिक देणी (Liabilities) जास्त असतात.
  • हे लोक एक कर्ज मिटवण्यासाठी दुसरे कर्ज काढतात किंवा एक कर्ज संपले की दुसरे कर्ज काढतात.
  • यांना कर्ज काढून किंवा उसने घेऊन खर्च करण्याची सवय असते.
  • एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने देतात.
  • यांची आर्थिक स्थिती फुटलेल्या मडक्यासारखी असते. जेवढे पाणी भराल तेवढे वाहून जाणार.
  • पती-पत्नीपैकी एक खर्चीक व दुसरा बचतीच्या स्वभावाचा असेल तर नेहमी वाद होतात.

यावरील उपाय :

  • गरज आणि मागणी यातील फरक समजून गरजेलाच प्राधान्य दिले पाहिजे.
  • गरजांची यादी काळजीपूर्वक तयार करावी व कधीही खर्च करण्याचा विचार मनात आला की यादी तपासावी.
  • खिशात कमीत कमी व गरजेपुरतेच पैसे बाळगावेत.
  • क्रेडिट कार्डसपासून दूर राहिले पाहिजे.
  • कमाई-बचत=खर्च हे समीकरण अवलंबवावे.
  • खर्च लिहिण्याची सवय लावावी, ज्यामुळे जाणीव वाढेल.
  • जवळच्या लोकांशी बचतीच्या सवयीविषयी चर्चा करावी.
  • बचत व गुंतवणूक याचा अभ्यास व त्याची अंमलबजावणी करावी
  • तज्ज्ञ व्यक्तींकडून सल्ला घ्यावा.

मनोवैज्ञानिक कारणे:

  • यांना पैसे जवळ असले की जोपर्यंत पैसे संपत नाहीत तोपर्यंत बेचैनी वाटते.
  • यांना खर्चाचे व्यसन असते. आपण वेगवेगळी व्यसने जर पाहिली उदा. सिगारेट, दारू, सिनेमा पाहणे, ठरावीक खाद्यपदार्थ खाणे वगैरे गोष्टी शारीरिकपेक्षा मानसिक व्यसनं बनतात आणि ती पूर्ण केल्याविना यांना चैन पडत नाही. तसेच खर्चीक व्यक्तिमत्त्वाला खर्च केल्याशिवाय चैन पडत नाही.
  • आत्मसन्मानाचा अभाव, कमी आत्मविश्वास, स्वप्रतिमेबद्दल शंका, भीती, अपराधभाव किंवा एकटेपणा यापासून वर्तमानकाळात तात्पुरती सुटका करण्यासाठी एक भुलीचे औषध म्हणून काहीतरी खरेदी करून धुंदी मिळवण्यासाठी खर्च करतात.
  • स्वत:च्या खर्चीक वागण्याचा यांना अभिमान वाटत असतो. त्यामुळे त्यांना खर्च करणे चुकीचे वाटत नाही.
  • पैसे असताना हे लोक जेवढे बेचैन असतात तेवढे पैसे नसताना नसतात.
  • भविष्याबद्दल काहीच चिंता नसते.

 

किरण लाळसंगी

kiranslalsangi@gmail.com 

लेखक पुणेस्थित समुपदेशक आहेत.