करोनाच्या रुग्णांचं प्रमाण नियंत्रणात येऊ लागलेलं असताना हळूहळू बाजारात तेजी दिसू लागली आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजार उघडला, तेव्हा सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठत ६० हजारांच्या पुढे मजल मारली. सेन्सेक्सनं सकाळीच ६०.६२१ अशी विक्रमी उसळी घेत बाजारात सकारात्मक वातावरण तयार केलं. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एम अँड एमच्या शेअर्सनं केलेली जोमदार कामगिरी सेन्सेकच्या उसळीला कारणीभूत ठरल्याचं दिसून आलं. यापैकी एम अँड एमनं सर्वाधिक ३ टक्क्यांची उसळी घेतली. त्यापाठोपाठ पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, एल अँड टी, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांनी देखील जोरदार कामगिरी केली.

दरम्यान, सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टी५० नं देखील जोरदार मुसंडी मारत १८ हजारांच्या वर झेप घेतली. निफ्टी बँक इंडेक्स ०.४ टक्के, निफ्टी ऑटो २.२ टक्के तर निफ्टी आयटी ०.५ टक्क्यांनी वधारला. निफ्टी५०नं सुरुवातीलाच १८ हजार १०० अंकांची नोंद केली.