• मेष:-
    विचारांना नवीन चालना मिळेल. घरातील वातावरण आनंदी असेल. जुने मित्र भेटतील. कामाची दगदग राहील. घरातील कामात दिवस निघून जाईल.
  • वृषभ:-
    स्त्रीवर्गाच्या मदतीने कामे होतील. अपेक्षित लाभ हाती येईल. तुमचा सन्मान केला जाईल. धार्मिक कामातील सहभागातून समाधान लाभेल. जमिनीची कामे होतील.
  • मिथुन:-
    वैवाहिक सौख्य द्विगुणीत होईल. पत्नीला चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलून कामे कराल. कौटुंबिक प्रगती साधता येईल. व्यावसायिक लाभाचा दिवस.
  • कर्क:-
    दिवस सौख्यकारक असेल. चैनीवर भर द्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. विचारांना योग्यवेळी आवर घालावी.
  • सिंह:-
    क्रोधावर नियंत्रण ठेवावे. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. संयम बाळगावा लागेल. क्षणिक सौख्याच्या मागे लागू नका. हातातील कामात विशेष लक्ष घालावे.
  • कन्या:-
    जोडीदाराच्या सहवासात रमाल. जवळच्या मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. ऐषारामाच्या वस्तूंची खरेदी कराल. तुमचा नावलौकिक वाढेल.
  • तुळ:-
  • मित्रमंडळींशी सलोखा वाढवावा. अडचणीतून मार्ग काढाल. तुमच्या कामावर सगळे खुश असतील. आर्थिक मान सुधारेल. कामे अपेक्षेनुसार पार पडतील.
  • वृश्चिक:-
    नोकरदारांचा ताण वाढू शकतो. थोरांशी मतभेद टाळावेत. सरकारी कामात विलंब संभवतो. कामाला अपेक्षित गती येईल. जवळचा प्रवास चांगला होईल.
  • धनु:-
    कौटुंबिक वातावरणात रमून जाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. आवडीचे पदार्थ खाण्याची हौस पूर्ण कराल. घरगुती कामाच्या वस्तू खरेदी कराल.
  • मकर:-
    पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकांतील जवळीक वाढेल.
  • कुंभ:-
    काही गोष्टी जुळवून घ्याव्यात. स्वाभाविक विरोध दर्शवू नये. खर्चाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कामात लक्ष घालाल. महत्त्वाकांक्षा बाळगाल.
  • मीन:-
    जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे. तामसी पदार्थ खाण्याची आवड पूर्ण कराल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. जवळचे मित्र भेटतील. स्त्रीसमुहात वावराल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर