Budh Gochar 2024: धनसंपत्ती, व्यवसाय, वाणी यांच्यासाठी कारक आणि पूरक अशी ओळख असलेला बुध ग्रहाने आज २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी शनिदेवाच्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाच्या राशी बदलामुळं काही राशींची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा आणखी चांगली होण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय, करिअर यामध्ये यश-प्रगतीची संधी, लाभ मिळू शकतो, जाणून घेऊया नेमका कोणत्या राशींना बुधाच्या स्थान बदलाचा फायदा होऊ शकतो.

‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु?

मेष राशी

बुधाचा राशी बदल या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. बुध ग्रहाने मेष राशीच्या अकराव्या भावात गोचर केलं आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. नोकरदार लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. यासोबतच कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : ७ मार्चपासून ‘या’ राशी मालामाल होण्याची शक्यता; शनिदेवाच्या राशीत शुक्रदेव गोचर करताच घरात नांदू शकते सुख-समृध्दी )

वृषभ राशी

कुंभ राशीत बुधाचं गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. वृषभ राशीच्या दहाव्या भावात बुधदेवाने गोचर केलं आहे. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मान-सम्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. हा गोचर तुमच्या नात्यात प्रेम आणि स्नेह वाढवणारा ठरु शकतो.

मिथुन राशी

या राशीच्या नवव्या भावात बुधदेवाने गोचर केलं आहे. बुधचा हा गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरु शकतो. तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या राशीच्या विद्यार्थ्यांना बुध गोचरचा लाभ मिळू शकतो. बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते. या काळात आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. बरेच दिवस रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)